शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

औरंगाबादच्या तरुणाईला ‘शॉर्टफिल्मस्’ची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:19 AM

शहरातील महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला तर सहज कोणत्या ना कोणत्या ‘शॉर्ट फिल्ममेकर’शी तुमची गाठ पडेल. कॅमेरा घेऊन आपल्याच मित्रांसोबत काही तरी व्हिडिओ शूटिंग करतानाचे दृश्य कॉलेज तरुणाईच्या सवयीचे झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘शॉर्टफिल्म’ हा शब्द आता काही नवीन किंवा अपरिचित नाही. शहरातील महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला तर सहज कोणत्या ना कोणत्या ‘शॉर्ट फिल्ममेकर’शी तुमची गाठ पडेल. कॅमेरा घेऊन आपल्याच मित्रांसोबत काही तरी व्हिडिओ शूटिंग करतानाचे दृश्य कॉलेज तरुणाईच्या सवयीचे झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून तर हे लोण खूपच वाढले आहे.शहरातील तरुणांनी तयार केलेले लघुचित्रपट (शॉर्टफिल्म) अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गाजलेले आहेत. चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उतरू पाहणाºया मुलांसाठी शॉर्टफिल्म ही पहिली पायरी आहे. चित्रीकरणाचे तंत्र अवगत करण्याची ही संधी असते, असे हृषिकेश होशिंग याने सांगितले. कॉलेजमध्ये शिकत असतानापासून तो शॉर्टफिल्म तयार करतो. तो म्हणतो, ‘पत्रकारिता किंवा जनसंवाद शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे प्रकल्प कार्य म्हणून लघुचित्रपट किंवा माहितीपट तयार केले. ते बनवत असताना आवड निर्माण होत गेली. आमच्या सोबतचे अनेक मित्र आता पुणे-मुंबईला चित्रपट व जाहिरात क्षेत्रात काम करीत आहेत.शॉर्टफिल्म मेकिंगला सध्या शहरात आलेले हे चांगले दिवस फार अलीकडचे आहेत. दहा वर्षांपूर्वी क्वचितच लोक या क्षेत्रात धडपड करायचे. ‘मी जेव्हा या शॉर्टफिल्म बनवायचो तेव्हा आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. ही गोष्ट असेल साधारण दहा वर्षांपूर्वीची. तेव्हा खूप संघर्ष करावा लागायचा. दर्जेदार लघुचित्रपटाच्या निर्मितीसाठी लागणारी साधनसामग्री आणि तंत्रज्ञान आजच्याप्रमाणे सहजासहजी उपलब्ध व्हायचे नाही, असे शरद शिंदे यांनी सांगितले. दहावीनंतरच या क्षेत्रात उतरलेल्या शरद शिंदे यांनी वयाच्या २३ व्या वर्षीच व्यावसायिकरीत्या काम करण्यास सुरुवात केली होती.‘आज तंत्रज्ञान फार प्रगत झाले आहे. औरंगाबादेत महानगरांसारखी साधने उपलब्ध झाली आहेत. शिवाय मोबाइल व इंटरनेटमुळे तर शॉर्टफिल्म मेकिंग फार अवघड गोष्ट राहिली नाही.यूट्यूबसारख्या माध्यमामुळे तयार केलेले काम दाखविण्याचे व्यापक आणि प्रभावी माध्यम मिळाले आहे. शिवाय सोबत दिमतीला सोशल मीडिया आहेच.’त्यांची ‘कोंदण’ ही शॉर्टफिल्म अनेक महोत्सवात गाजली. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. शिवाय प्रा. अनिलकुमार साळवे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘१५ आॅगस्ट’ या अमेरिकेतील महोत्सवात निवडल्या गेलेल्या शॉर्टफिल्मच्या छायाचित्रीकरणापासून ते एडिटिंग व इतर तांत्रिक बाजू सांभाळल्या. ‘शॉर्टफिल्म तयार करीत असताना सिनेमॅटोग्राफी, आॅडिओ, एडिटिंग अशा तांत्रिक बाजूंचा सराव होतो.’प्राथमिक पातळीवर प्राप्त झालेले हे ज्ञान पुढे चालून चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करताना खूप कामी येते. विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागापासून ते अभियांत्रिकीपर्यंत सर्व शाखांचे विद्यार्थी सध्या शॉर्टफिल्म बनवताना दिसतात. शॉर्टफिल्मकडे केवळ छंद म्हणून नाही तर शिकण्याची प्रक्रिया म्हणून पाहण्याचा सल्ला हे फिल्ममेकर्स देतात.