औरंगाबाद : राज्यात ओमायक्रॉनचे (Omicron Variant) रुग्ण हळूहळू वाढत आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये २९ रुग्ण आढळून आले. सुदैवाने औरंगाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला नाही. औरंगाबादपासून अत्यंत जवळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली. अवघ्या १४८ कि.मी. अंतरावर रुग्ण आढळून आहे. या विषाणूचा अटकाव करणे कोणालाही शक्य नाही, खबरदारी हाच एकमेव उपाय असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
कोरोना प्रतिबंधाच्या दोन लस घेतलेल्या रुग्णांना ओमायक्रॉनचा फारसा त्रास झाला नसल्याचे आढळून आले. जिल्हा प्रशासन आणि महापालिका आरोग्य विभाग लसीकरणावर प्रचंड भर देत आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे शहरातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झालेले असावे, हा प्रशासनाचा हेतू आहे. मात्र नागरिक लस घेण्यास तयार नाहीत. मास्क तर अजिबात वापरायला तयार नाहीत. त्यामुळे प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागत आहेत. बुधवारपासून लस न घेतलेले नागरिक शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळून आल्यास ५०० रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली गेली. त्यानंतरही फारशी सुधारणा झालेली नाही. राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आलेत. या रुग्णांची संख्या तब्बल ३१ पर्यंत गेली. ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होतो, असा आरोग्य विभागाचा दावा आहे. त्यानंतरही नागरिक खबरदारी घेण्यास तयार नाहीत, हे विशेष.
रुग्णसंख्या, औरंगाबादपासून अंतरजिल्हा- रुग्ण- अंतरपिंपरी चिंचवड- १०- २४५ कि.मी.पुणे- २- २३९ कि.मीमुंबई- १२- ३६४ कि.मी.कल्याण डोंबिवली-१- ३३३ कि.मी.लातूर- १- २६३ कि.मी.बुलडाणा- १- १४८ कि.मी.नागपूर- १- ४७५ कि.मी.वसई-विरार-१- ३५८ कि.मी.उस्मानाबाद -२- २५६ कि.मी.