औरंगाबाद : औरंगाबाद शहरात उद्यापासून पेट्रोलपंप सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू राहणार (petrol will be available from tomorrow from 8 am to 7 pm) असल्याचे पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने आज जाहीर केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या 'नो लस,नो पेट्रोल' (No Vaccine, No Petrol) या मोहिमेला संपूर्ण सहकार्य करत असल्याने मनुष्य बळाच्या तुटवड्यातून हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे डीलर्स असोसिएशनच्या अखिल अब्बास यांनी कळवले आहे.
जिल्ह्यात कोरोना लसीकरण कमी झाल्याने थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडून कारणे जाणून घेतली. प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यासाठी विविध उपययोजना लागू केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी 'नो लस, नो पेट्रोल' अशी मोहीम जाहीर करून पेट्रोल पंपावर लस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासूनच पेट्रोल देण्याचे आदेश दिले. आता या आदेशाचे पालन करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे, असे कारण देत पेट्रोलपंप डीलर्स असोसिएशनने सकाळी ८ ते सायंकाळी ७ यावेळेतच पेट्रोलपंप सुरु राहणार असल्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर केले. लसीकरण प्रमाणपत्र तपासावं लागत असल्याने, मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचं अखिल अब्बास यांनी सांगितले.
लस नसेल तर किराणा, मेडिकल, दारूही नाही मिळणार ( No Vaccine No Alcohol )लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलली असून, त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. पेट्रोलपंप, रेशन दुकाने, रिक्षा, ट्रॅव्हल्स एजन्सीनंतर आता दुकाने, मेडिकल स्टोअर्सकडे प्रशासनाने मोर्चा वळविला आहे. सर्व दुकानांसह परवानाधारक मद्य विक्री दुकानांत कामगारांची लसीकरणाची किमान एक मात्रा पूर्ण झालेली असावी. तसेच किमान एक डोस घेतलेल्या ग्राहकालाच यापुढे मद्य, किराणा, औषधी खरेदीची मुभा राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास अशी दुकाने सील केली जातील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
लसीकरण वेळ वाढवली कोरोना लसीकरणाचा टक्का वाढवा म्हणून लसीकरणाच्या वेळेत देखील वाढ करण्यात आली आहे. आता केंद्रावर लसीकरण सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत करता येणार असलायची माहिती प्रशासनाने दिली आहे.