औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर नुकत्याच झालेल्या १२ वर्षांखालील आॅल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या अर्णव पांगारकर याने उपविजेतेपद पटकावले. त्याला अंतिम सामन्यात गुजरातच्या याग्ना पटेल याच्याकडून ३-६, ६-३, ६-0 असा पराभव पत्करावा लागला. अंतिम फेरी गाठण्याआधी अर्णवने उपांत्यपूर्व फेरीत नीरज रिंगणगावकरचा ८-२ आणि उपांत्य फेरीत पार्थ देवरुखकरचा ९-५ असा पराभव केला होता.मुलींच्या गटात सानिका भोगाडे हिने विजेतेपद पटकावले. नगरच्या सानिका हिने मुंबईच्या उर्वी काटे हिचा ६-0, ६-२ असा पराभव केला. अंतिम सामन्यानंतर सौरभ कटियार यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. या प्रसंगी आशुतोष मिश्रा, टुर्नांमेंट सुपरवायझर प्रवीण गायसमुद्रे आणि गजेंद्र भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आॅल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या अर्णवला उपविजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:44 AM