शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

औरंगाबादेतील ‘बसपोर्ट’चा चक्का जाम; दोन वर्षांपूर्वी झाली होती घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 5:26 PM

एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीचा चक्का जाम झाला आहे.

ठळक मुद्देएअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला.जानेवारी २०१६ मध्ये राज्यात औरंगाबादसह इतर काही शहरांमध्ये बसपोर्ट उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

औरंगाबाद : एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीचा चक्का जाम झाला आहे.

एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला. जानेवारी २०१६ मध्ये राज्यात औरंगाबादसह इतर काही शहरांमध्ये बसपोर्ट उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ‘डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्स्फर-लीज’ या तत्त्वावर बसपोर्ट बांधण्यात येणार आहे. बसपोर्ट जाहीर केल्याच्या वर्षभरानंतर म्हणजे जानेवारी २०१७ मध्ये एस. टी. महामंडळातर्फे औरंगाबादसह राज्यातील ९ शहरांत उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टसाठी निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रिया दोन वर्र्षे उलटूनही काही केल्या पूर्ण होत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचा विचार करून सुविधा उभारण्यात येणार आहे; परंतु त्यासाठी कोणी कंत्राटदार पुढे येत नसल्याचे दिसते. त्यामुळे ई-निविदेचा कालावधी वाढविण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. परिणामी निविदा प्रक्रिया सुरूच आहे.

मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी बसपोर्ट उभारण्यासाठी नुसती कागदोपत्री प्रक्रिया सुरू असल्याने गेल्या अडीच वर्षांपासून बसस्थानकाच्या इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. बसस्थानकाच्या छताचे प्लास्टर उखडले असून, फलाटावरील फरशा, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ता आदींची दुरवस्था झालेली आहे. पावसाळा नसतानाही टाक्यांच्या गळतीने छताबरोबर खांब आणि भिंतीमध्ये पाणी झिरपण्याचे प्रकार होत आहेत.  

उभारणीला किती वर्षे?एसटी महामंडळाच्या प्रवाशांना लक्झरियस सेवा पुरविणे हा बसपोर्ट उभारणीमागील उद्देश आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बसपोर्ट उभारणीलाही मोठा कालावधी जाणार आहे. बसपोर्टमध्ये प्लॅटफॉर्म, सुसज्ज प्रतीक्षालय, पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह, चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृह व स्वच्छतागृह, एटीएम, औषधालय, रिटेल शॉप, फूड कोर्ट, फूड काऊंटर,  प्रशासकीय कार्यालय, व्हीआयपी रूम, कॉन्फरन्स रूम आदी सुविधा राहतील; परंतु दोन वर्षे होऊनही निविदा प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने बसपोर्टची उभारणी होऊन या सुविधा कधी मिळणार,असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.

कोणीतरी पुढे आले पाहिजेबसपोर्टची निविदा काढलेली आहे. सर्वांसाठी ही निविदा आहे. उभारणीला उशीर होत असल्याचा काहीही संबंध नाही. बसपोर्ट उभारणीसाठी कोणीतरी पुढे आले पाहिजे, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले.

टॅग्स :Aurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकDiwakar Raoteदिवाकर रावतेstate transportएसटीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना