औरंगाबाद: केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय पातळीवर औरंगाबाद शहराने २९ वा तर राज्य पातळीवर ९ वा क्रमांक मिळविला आहे.
मागील काही वर्षांपासून ऐतिहासीक शहर स्वच्छ सुंदर दिसावे यासाठी महापालिकेकडून व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. घनकचरा, उघड्यावर प्रातविधी, सार्वजनिक शौचालये आदी क्षेत्रात काम केले आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये औरंगाबादने मागील वर्षी औरंगाबाद २६ व्या क्रमांकावर होते. औरंगाबादच्या ‘रँकिंग’ मध्ये घसरण झाली आहे. २०२० मध्ये शहराची रॅकिंग ४६ व्या क्रमांकावर होती.