औरंगाबाद : शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल २ हजार ६०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली आहे तर काही कामे होत आली आहेत. २६०० पैकी किमान १ हजार कोटींचा निधी आजवर खर्च झाल्याचे दिसते आहे. उर्वरित निधी टप्प्याने मिळण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्यशासनाच्या निधीतून ही कामे केली जात आहेत. प्रगतिपथावरील कामांमध्ये ठाकरे स्मारक व स्मृतिवन, क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम साडेतीन कोटींतून सुरू आहे.
औरंगाबाद सफारी पार्क- डीपीआर १४७ कोटींचा असून २० टक्के काम झाले आहे. शहर पाणीपुरवठा योजनेचे १६८० कोटींतून काम सुरू आहे. १० कोटींतून मेल्ट्रॉन येथे ३४५ खाटांचे हॉस्पिटल सुरू केले. घनकचरा व्यवस्थापनासाठी १४८ कोटींतून ७२ कोटी मनपाला मिळाले. रस्त्यांसाठी १५२ कोटी दिले. स्मार्ट सिटी योजनेतून सिटी बससाठी २३६ कोटी दिले. मास्टर सिस्टम इंटिग्रेटर, आयटी कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सिस्टीमसाठी १७८ कोटी संत एकनाथ रंगमंदिराचे नूतनीकरणास आठ कोटी, तर ऐतिहासिक दरवाज्यांच्या संवर्धनासाठी ४ कोटी मिळाले आहेत. विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ४०० मी. चा सिंथेटिंक ट्रॅक मंजूर त्यासाठी ७ कोटींचा खर्च होणार आहे.
या कामांचाही आहे समावेशश्रीक्षेत्र वेरूळ घृष्णेश्वर मंदिर येथे एक हजार व्यक्ती क्षमतेचा मोठा हॉल व १७७ गाळ्यांचे व्यापारी संकुल प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे खर्च २८.६० कोटी लागणार असून, निविदा प्रक्रिया सुरू आहे. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान कामाची निविदा काढण्यात आली आहे.