लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : औरंगाबाद महानगरपालिकेने शहरातील कचरा गुपचूप शनिवारी मध्यरात्री खुलताबाद येथील उरूस मैदान परिसरातील कब्रस्तान व म्हैसमाळ रोडलगत आणून टाकल्याने रात्रीच लोकांनी विरोध करून एक टिप्पर पकडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. औरंगाबाद मनपाच्या या ‘आगाऊ’पणामुळे खुलताबादकर संतप्त झाले आहेत. दर्गाह कमिटीने दिलेल्या फिर्यादीवरून मनपा झोन क्र. ३ च्या वॉर्ड अधिकाºयांसह पाच जणांविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कचरा वाहतूक करणारे टिप्पर जप्त करण्यात आले.औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून गाजत असून, कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळविला आहे. खुलताबादेत शनिवारी मध्यरात्री तीन ते चार टिप्पर कचरा उरूस मैदान परिसरातील कब्रस्तानात आणून टाकला तर एक टिप्पर कचरा हा म्हैसमाळ घाटाखालील काला तलाव परिसरात आणून टाकला. दरम्यान, रात्री खुलताबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बसलेल्या काही युवकांना टिप्पर जात असताना दुर्गंधी आली व ते कचºयाची विल्हेवाट लावत असल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब गावकºयांसह पोलिसांनाही कळविली.यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक हरीश खेडकर यांनी लगेच पोलिसांचे वाहन व काही युवकांना सोबत घेऊन म्हैसमाळ रस्ता गाठला. त्यावेळी तलावाजवळ कचरा टाकून लामणगावमार्गे टाकळी राजेरायकडे जात असलेले टिप्पर क्रमांक एमएच-२० बीटी ३२१ पकडले. खुलताबाद उरूस मैदान परिसरातील कब्रस्तान परिसरात कचरा टाकून दोन टिप्पर फरार झाले. यावेळी पोलिसांनी सर्वांना शांत करून हा प्रश्न रात्रीच मार्गी लावला नसता कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता.दरम्यान, सकाळी ही वार्ता शहरात पसरताच लोकांनी संतप्त होऊन कारवाई करण्याची मागणी केली. खुलताबाद येथील दर्गा कमिटीचे सचिव मोईनोद्दीन शरफोद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खालेद खान नवाज खान, रफिक रशीद शेख, सागर गणपत माने (तिघेही रा. हुसेनखाँ कॉलनी औरंगाबाद) वझोन क्रमांक ३ चे वॉर्ड अधिकारी मुकुंद कुलकर्णी, रमेश जाधव (खुलताबाद) यांच्याविरुद्ध कलम २६९, २७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी टिप्पर चालकासह इतरांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास बीट जमादार शेख शकील हे करीत आहेत.धार्मिकस्थळी कचरा टाकणे योग्य नाही४खुलताबाद शहर हे धार्मिक व पर्यटनस्थळ असून, दररोज हजारो पर्यटक व भाविक येथे भेट देत असतात. सध्या श्रावण महिना असून, वेरूळ, खुलताबाद, म्हैसमाळ येथे लाखो भाविकांची गर्दी होत असून, मनपाने टाकलेल्या कचºयामुळे मोठी दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे भाविकांना नाक दाबून जावे लागत आहे. मनपाने पुन्हा कचरा टाकण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसतील, असे खुलताबादचे माजी नगराध्यक्ष अॅड. कैसरोद्दीन यांनी सांगितले.खबरदार कचरा टाकाल तर...४खुलताबाद येथील उरूस मैदान परिसरातील कब्रस्तान परिसरात कचरा टाकून मनपाने खुलताबादकरांच्या भावना दुखवल्या असून, यापुढे खुलताबाद परिसरात कचरा टाकाल तर खबरदार, असा इशारा दर्गा कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक मुनीबोद्दीन मुजीबोद्दीन यांनी दिला आहे.
औरंगाबाद शहराचा कचरा फेकला खुलताबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:16 AM
औरंगाबाद महानगरपालिकेने शहरातील कचरा गुपचूप शनिवारी मध्यरात्री खुलताबाद येथील उरूस मैदान परिसरातील कब्रस्तान व म्हैसमाळ रोडलगत आणून टाकल्याने रात्रीच लोकांनी विरोध करून एक टिप्पर पकडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले.
ठळक मुद्देमहापालिकेचा आगाऊपणा: खुलताबादकर संतप्त; वॉर्ड अधिकाऱ्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, टिप्पर जप्त