शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
2
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
4
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
5
मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
7
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
8
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
12
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
13
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
15
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
16
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
17
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
19
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
20
Maharashtra Assembly Election Result 2024: अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 

निधी नसल्याने औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा रेंगाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 3:03 PM

मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसर्‍या टप्प्यातील काम गेल्या अडीच वर्षांपासून रेंगाळले आहे. निधीअभावी हे काम २०१८ मध्येही सुरू होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे एसटी महामंडळाकडून मध्यवर्ती बसस्थानकात उभारण्यात येणारे ‘बसपोर्ट’देखील रखडले आहे. केवळ कागदोपत्रीच प्रवाशांना सुसज्ज सोयी-सुविधांची स्वप्ने दाखविली जात आहेत.

औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसर्‍या टप्प्यातील काम गेल्या अडीच वर्षांपासून रेंगाळले आहे. निधीअभावी हे काम २०१८ मध्येही सुरू होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे एसटी महामंडळाकडून मध्यवर्ती बसस्थानकात उभारण्यात येणारे ‘बसपोर्ट’देखील रखडले आहे. केवळ कागदोपत्रीच प्रवाशांना सुसज्ज सोयी-सुविधांची स्वप्ने दाखविली जात आहेत.

औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये समावेश झाला आणि पहिल्या टप्प्यात भव्य इमारत उभी राहिली. मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसर्‍या टप्प्यात रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीच्या जागेत विकासकामे केली जाणार आहेत. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तात्काळ दुसर्‍या टप्प्यातील काम सुरू होणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. ३ जुलै २०१५ रोजी दुसर्‍या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले; परंतु अडीच वर्षांनंतरही हे काम सुरूच झालेले नाही. निधी मिळाल्यानंतर काम रेल्वेस्टेशनचे काम पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने केले जाणार आहे; परंतु रेल्वेकडे निधी नाही. याबरोबर पर्यटन मंत्रालयाकडूनही निधी उपलब्ध झालेला नाही, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा म्हणाले.

पर्यटकही अवाक् रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकाची इमारतही गेल्या दहा वर्षांत जीर्ण झाली आहे. छताचे प्लास्टर ठिकठिकाणी कोसळले आहे. भिंतीमधून पाणी झिरपते. ही अवस्था पाहून सर्वसामान्य प्रवाशांबरोबर पर्यटकही अवाक् होत आहेत. बसपोर्टची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली.अर्थसंकल्पात नुकतीच औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या बदलासाठी एकीकडे यंदा एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर दुसरीकडे औरंगाबाद, हैदराबाद, नांदेड, तिरुपती रेल्वेस्टेशनचा पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने विकास करण्यासाठी ७५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे एवढ्याशा निधीतून रेल्वेस्टेशनवर कामे कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे वर्षभरात जुन्या इमारतीच्या जागी विकासकामे सुरू होणे अवघड आहे.

याबरोबरच जानेवारी २०१६ मध्ये औरंगाबादसह इतर काही शहरांमध्ये बसपोर्ट उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर ‘डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्स्फर-लीज’ या तत्त्वावर बसपोर्ट बांधण्यात येणार आहे. बसपोर्ट जाहीर केल्याच्या तब्बल वर्षभरानंतर म्हणजे जानेवारी २०१७ मध्ये एसटी महामंडळातर्फे औरंगाबादसह राज्यातील ९ शहरांत उभारण्यात येणार्‍या बसपोर्टसाठी निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली; परंतु अद्यापही प्रत्यक्षात बसपोर्टचे काम सुरू होत नाही.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद