शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा ३ वर्षांपासून कागदावरच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 8:25 PM

भूमिपूजनाच्या तीन वर्षांनंतरही दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आराखडा (डिझाईन) पूर्ण झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील काम गेल्या तीन वर्षांपासून कागदावरच आहे. भूमिपूजनाच्या तीन वर्षांनंतरही दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आराखडा (डिझाईन) पूर्ण झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये समावेश झाला आणि पहिल्या टप्प्यात भव्य इमारत उभी राहिली. मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यात रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीच्या जागेत विकासकामे केली जाणार आहेत. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तात्काळ दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ३ जुलै २०१५ रोजी दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले; परंतु तीन वर्षे उलटल्यानंतरही हे काम सुरूच झालेले नाही. 

रेल्वेस्टेशनचे काम पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने करून देश-विदेशातील पर्यटकांना नजरेसमोर ठेवून सुविधा दिल्या जातील, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले; परंतु प्रवाशांना सुसज्ज सोयी-सुविधांची स्वप्ने दाखविली जात असून, रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे हे फक्त ‘बोलाचाच भात’ ठरते आहे. 

दुरवस्थेवर वरवर पांघरूनस्टेशनच्या जुन्या इमारतीची पडझड झालेली आहे. ‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद स्टेशनवर पाहणी दौरा आहे. त्यामुळे जुन्या स्टेशनच्या इमारतीची रंगरंगोटी आणि फरशा बदलून दुरवस्थेवर के वळ वरवर पांघरून घातले जात असल्याची ओरड प्रवाशांतून होत आहे.

चांगल्या कामास प्राधान्य रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची डिझाईन अंतिम केली जात आहे. अधिकाधिक चांगले काम करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनAurangabadऔरंगाबादGovernmentसरकारRailway Passengerरेल्वे प्रवासी