औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटनेची उपसमिती नुकतीच जाहीर झाली आहे. त्यात मराठवाड्यातील कमांडर विनोद नरवडे, पंकज भारसाखळे, डॉ. दयानंद कांबळे, प्राचार्य शशिकला निलवंत व प्रा. बाबू यादव यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्य संघटनेच्या बैठकीत अध्यक्ष आॅलिम्पियन आदिल सुमारीवाला यांनी ही उपसमिती जाहीर केली. त्यात कमांडर विनोद नरवडे, बाबू यादव यांची शिस्तपालन समितीत, पंकज भारसाखळे यांची मॅरेथॉन व रोड रेस नियोजन समितीत, डॉ. दयानंद कांबळे यांची तांत्रिक समितीत, तर प्राचार्य शशिकला निलवंत यांची महिला समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. विनोद नरवडे यांना अनेक मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्याचा अनुभव आहे, तर पंकज भारसाखळे हे एक उत्तम संघटक म्हणून गणले जातात. दयानंद कांबळे यांचा तांत्रिक बाबीत हातखंडा आहे, तर महिला खेळाडूंच्या समस्या दूर करण्यासाठी प्राचार्य शशिकला निलवंत यांची निवड करण्यात आली आहे. बाबू यादव हे जालना जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव आहेत. या निवडीबद्दल राज्य अॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, कार्याध्यक्ष डॉ. रंजन बडवणे, उपाध्यक्ष मोहन मिसाळ, सचिव डॉ. फुलचंद सलामपुरे, कोषाध्यक्ष प्राचार्य बाबूराव गंगावणे यांनी अभिनंदन केले आहे.
औरंगाबादचे नरवडे, कांबळे, नीलवंत, भारसाखळे राज्य अॅथलेटिक्स संघटनेच्या उपसमितीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 1:03 AM