शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

औरंगाबादचा सार्वजनिक गणेशोत्सव शंभरीकडे; १९२४ ला झाला होता स्थापन गणेश महासंघ

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 31, 2022 3:41 PM

औरंगाबादकर यंदा ९८ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत 

औरंगाबाद : औरंगाबादकर यंदा ९८ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. शहरात पहिल्या गणपती मंडळाला स्थापन होऊन १२३ वर्षे पूर्ण झाली असली तरी गणेश महासंघाची स्थापना १९२४ साली झाली. आता येथील सार्वजनिक गणेश महासंघाची वाटचाल शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणजे येथील गणेश महासंघ होय.

लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची प्रेरणा घेऊन औरंगाबादेत १८९९ मध्ये राजाबाजार येथे पहिले सार्वजनिक ‘गणेशभक्त भजन मंडळ’ स्थापन झाले. मंडळांची वाढती संख्या लक्षात घेता १९२४ मध्ये औरंगाबाद गणेश संघ स्थापना करण्यात आला. पहिले अध्यक्ष डॉ. संग्रामसिंह चौहान ठरले. कार्यकारिणीत डॉ. पुरवार, नाथप्रसाद दीक्षित, दादासाहेब गणोरकर, गोविंदभाई श्रॉफ, बाळासाहेब पवार, विनायक पाटील, बद्रीनारायण अग्रवाल, मुरलीधर गोलटगावकर, द्वारकादास पटेल, विजयेंद्र काबरा, बाबूराव काळे, अलफखान, प्रेमचंद मुगदिया, बाबूलाल पराती, जयसिंग महाराज, राजाराम बसैये, आदी मातब्बर असत.

अध्यक्षपदासाठी निवडणूक होईत्या काळात अध्यक्षपदासाठी ४ ते ५ उमेदवार उभे राहत. १९६६ मध्ये प्रथमच अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. मनमोहन अग्रवाल यांची अध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अरुणभाई कापडिया यांनी काम पाहिले होते. वसंत भवन, बालाजी धर्मशाळा व बन्सीलालनगर येथे प्रत्येकी २ वेळा म्हणजे एकूण ६ वेळा निवडणुका झाल्या. १९६९ या वर्षी छायाचित्रकार नाथप्रसाद दीक्षित अध्यक्ष झाले होते. १९७३ मध्ये सनसिंग ग्रंथी हे अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रकाश मुगदिया दोनदा अध्यक्ष झाले होते. शिवनाथ राठी, अशोक शहा यांनी अनेक पदांची जबाबदारी सांभाळली होती.

सर्व राजकीय पक्ष समभाव८० च्या दशकात गणेश महासंघाचे नाव ‘श्री औरंगाबाद गणेश महासंघ’ असे करण्यात आले. या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आहेत. निवडणुका न घेता अध्यक्षपदाची जबाबदारी दरवर्षी प्रत्येक राजकीय पक्षास दिली जाते. सर्व राजकीय पक्ष समभाव तेव्हापासून जपला जातो.

गणेशोत्सवातून घडले राजकीय नेतृत्वगणेशोत्सवाने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नेतृत्व करणारे नेते घडवले. यात किंगमेकर दादासाहेब गणोरकर, गोविंदभाई श्रॉफ, बजरंगलाल शर्मा, अशोक पाटील डोणगावकर, मुरलीभाऊ गवळी, लखन पहिलवान, हरिभाऊ जगताप, शालिग्राम बसैये, संतसिंग ग्रंथी, माणिक गंगवाल, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. किशनचंद तनवाणी, गंगाधर गाडे, रशीद मामू, नंदकुमार घोडेले, रतन घोंगते, किशोर तुलसीबागवाले, आदींचा समावेश होतो.

५० व्या वर्षी स्मरणिका प्रसिद्धश्री गणेश संघाला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा १९७३-१९७४ या वर्षी स्मरणिका प्रकाशित केली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGanesh Mahotsavगणेशोत्सव