औरंगाबाद : येथील प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडू सोनाली मिरखेलकर हिची आंध्र प्रदेश येथे उद्यापासून सुरू होणाºया राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील संघात निवड झाली आहे. एस. बी. ओ. ए. प्रशालेतील विद्यार्थिनी असणाºया सोनाली हिने गतवर्षी रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या १३ वर्षांखालील गटात जबरदस्त कामगिरी करताना एकेरीत उपविजेतेपद आणि दुहेरीत हर्षदा गावंडे हिच्या साथीने तिने विजेतेपद पटकावले होते. सोनाली मिरखेलकर हिला प्रशिक्षक हिमांशू गोडबोले आणि क्रीडा शिक्षिका मनीषा यादव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल तिला औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील, जावेद पठाण, नरेश गुंडिले, गिरीश राठोड, गुरमितसिंग आदींनी शुभेच्छा दिल्या.
औरंगाबादच्या सोनालीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:04 AM
येथील प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडू सोनाली मिरखेलकर हिची आंध्र प्रदेश येथे उद्यापासून सुरू होणाºया राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील संघात निवड झाली आहे.
ठळक मुद्देआंध्र प्रदेश येथे स्पर्धा : महाराष्ट्राचे करणार प्रतिनिधित्व