शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

औरंगाबादची कचराकोंडी फुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:41 AM

शहरात मागील पाच महिन्यांपासून साचलेला हजारो टन कचरा कुठे टाकायचा याबाबतची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका आणि कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्दे४० कि.मी.अंतर : हर्षवर्धन जाधव यांचा पुढाकार, मनपाकडून जागेची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात मागील पाच महिन्यांपासून साचलेला हजारो टन कचरा कुठे टाकायचा याबाबतची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका आणि कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद शहरातील सर्व कचरा ४० कि. मी. अंतरावर कन्नड तालुक्यात नेऊन प्रक्रिया करणार आहेत. या कचऱ्यापासून तयार होणारे खत शेतक-यांना मोफत देण्यात येईल. महापालिका अधिका-यांनीही ७० एकर जागेची पाहणी केली. रविवारपासून दररोज ५० ट्रक कचरा उचलून नेण्यात येणार आहे.शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. १६ फेबु्रवारीपासून नारेगाव येथे कचरा टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. मागील १४९ दिवसांपासून शहरात कचरा पडून आहे. आतापर्यंत २५ हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. मध्यवर्ती जकात नाका, हर्सूल, पडेगाव येथे कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार झाले आहेत. कचरा टाकण्यास नागरिकांकडून होणाºया विरोधामुळे महापालिकेचीही कोंडी झाली आहे. या कोंडीतून मार्ग निघणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.तीन जागांची पाहणीऔरंगाबाद शहरातील कचरा टाकण्यासाठी शनिवारी एकूण तीन जागांची पाहणी करण्यात आली. पिशोर भागातील कोळंबी येथील १२५ एकर गायरान जागा पाहण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद शहरापासून थेट हायवेवर लागणारे हतनूरजवळील घुसूर येथील ७० एकर गायरान जागा कचरा टाकण्यासाठी संयुक्तिक वाटली. याशिवाय नागदजवळील वाघुळखेडा येथील ३० हेक्टर जागेची चाचपणी करण्यात आली.कचºयावर प्रक्रिया करणारऔरंगाबाद शहरातील कचरा भौैगोलिकदृष्ट्या कन्नड तालुक्यात नेण्यात येणार आहे. ज्याठिकाणी कचरा टाकण्यात येईल, तेथे महापालिका प्रक्रियाही करणार आहे. कचºयापासून तयार होणारा खत शेतकºयांना मोफत देण्याचा निर्णयही आ. जाधव यांनी घेतला.कोणी तरी पुढाकार घ्यावा...समर्थनगरसारख्या वॉर्डातील पन्नास टक्के नागरिक व्हायरल फिवरमुळे आजारी पडले आहेत. शहरात मागील पाच महिन्यांपासून कचरा साचला आहे. गंभीर रोगराई पसरण्याची भीती आहे. शहराच्या चांगल्यासाठी कोणाला तरी पुढाकार घेणे गरजेचे होते. मी कन्नड तालुक्यातील नागरिकांना विश्वासात घेऊन कचºयावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.ल्ल हर्षवर्धन जाधव, आमदार, कन्नड

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव