औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेत औरंगाबादच्या यश साठे, शिवम राजपूत, प्रभूल कौर यांनी शनिवारी सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत जालन्याच्या खेळाडूंनीही वर्चस्व राखले. जालना येथील सत्यजित कदम, पार्थ ककनाट, ओम करवा यांनी गोल्डन कामगिरी केली.स्पर्धेचा निकाल (११ वर्षांखालील मुले) : १. यश साठे (औरंगाबाद), २. नमित कदम (जालना), ३. सार्थ सर्वे (रत्नागिरी).१३ वर्षांखालील : १. सत्यजित कदम (जालना), २. विवेक बोर्डे (औरंगाबाद), ३. अमन कीर्तेकर (रत्नागिरी). १५ वर्षांखालील : १. पार्थ ककनाट (जालना), २. शुभम घुगे (औरंगाबाद), ३. अनीष शिंदे (रत्नागिरी). १७ वर्षांखालील : १. शिवम राजपूत (औरंगाबाद), २. विश्वनाथ गलांडे (उस्मानाबाद), ३. आदिनाथ चव्हाण (हिंगोली). १९ वर्षांखालील मुले : १. ओम करवा (जालना), २. ओंकार जगताप (औरंगाबाद), ३. चेतन कदम (रत्नागिरी). मुली (१३ वर्षांखालील) : १. प्रभूल कौर (औरंगाबाद), २. गौरी राणे (अमरावती), ३. तेजस्वी ठाकूर (यवतमाळ). १५ वर्षांखालील मुली : १. हर्षाली बागूल (रत्नागिरी), २. अंजली जांगीड (वाशिम), ३. दर्शिता जाधव (रत्नागिरी). १७ वर्षांखालील मुली : १. सेजल कदम (रत्नागिरी), २. यशस्विनी कथळकर (यवतमाळ), ३. सहारा सय्यद (औरंगाबाद). १९ वर्षांखालील : १. शर्वरी पाटणकर (रत्नागिरी), २. गौरी भारती (अमरावती), ३. कल्पना जांगीड (वाशिम).या स्पर्धेत राज्यभरातील जवळपास २५० खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, सुनील डावकर, भूषण कदम, अनिल यादव, रीतेश शेळके व सतीश इंगळे यांच्या उपस्थितीत झाले.
औरंगाबादच्या यश, शिवम, प्रभूल यांना सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:47 AM
विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेत औरंगाबादच्या यश साठे, शिवम राजपूत, प्रभूल कौर यांनी शनिवारी सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत जालन्याच्या खेळाडूंनीही वर्चस्व राखले. जालना येथील सत्यजित कदम, पार्थ ककनाट, ओम करवा यांनी गोल्डन कामगिरी केली.
ठळक मुद्देराज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धा : जालन्याच्या सत्यजित, पार्थ, ओम यांची गोल्डन कामगिरी