छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाचे उदत्तीकरण सुरु आहे. आतापर्यंत आम्ही अभ्यास करीत होतो, औरंगजेबाची जागा काय आहे. देशाला या भुमीतील महापुरुष वंदनीय आहे. परंतु मुघल साम्राज, औरंगजेब हे कधीही वंदनीय असू शकत नाही. औरंगजेबाला लष्कर-ए-तैयबासारखाच अतिरेकी म्हणणेही कमी पडेल.
ते पुढे म्हणाले की, असे जुलमी, अत्याचारी विचार ओसामा बिन लादेनप्रमाणे समुद्रात टाकले पाहिजे. परत कोणी फुले वाहन्यासाठी जाऊ नये, अशी प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. जगातील सर्वात पुढारलेल्या अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला कुठं नेऊन टाकलं?, त्यांनी मध्य समुद्रात नेऊन टाकलं. त्यामुळे, या औरंगजेबाची कबरही मध्य समुद्रात नेऊन टाकली पाहिजे, असेही सदावर्ते म्हणाले. शहरात रविवारी दाखल झाल्यानंतर सदावते यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक आहे. शरद पवार यांचा वैचारिक व्हायरस आहे, त्याचं व्हेरियंट ही बँक आहे. आर्थिक नाडी ही शरद पवार यांच्या लोकांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे बँकेतूनही शरद पवार यांना, त्यांच्या वैचारिक व्हायरसला ’चले जाव’ यासाठी हा लढा आहे. त्यांच्यासाठी सावकारी लढा आहे, सावकारी निवडणूक आहे, तर कष्टकऱ्यांसाठी स्वाभीमानी आणि आर्थिक उन्नतीची लढाई आहे.
असदुद्दीन ओवैसी शिकागोत जातात आणि तिथे पाकिस्तानातील लोकांना भाऊ मानता की नाही, अशी चर्चा होते. त्यावर असदुद्दीन ओवैसीयांची चुप्पी आहे. ही गद्दारी देशात चालणार नाही, असेही ॲड. सदावर्ते म्हणाले. पत्रकार परिषदेस मच्छिंद्र बनकर, मकरंद कुलकर्णी यांच्यासह एसटी महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.