- बापू सोळुंकेछत्रपती संभाजीनगर : केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्त महत्त्वाकांक्षी स्मार्ट औद्योगिक सिटी अर्थात ऑरिकच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च केले. शिवाय उर्वरित विकासासाठी आणखी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. पण, मागील पाच वर्षांत तेथे मोठी गुंतवणूक असलेला एकही ‘अँकर प्रोजेक्ट’ आणण्यात शासनास यश आले नाही. यामुळे ऑरिक सिटी पांढरा हत्ती ठरतोय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने ७ हजार ९४७ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. शेंद्रा पट्ट्यात सुमारे दोन हजार एकर, तर बिडकीनमध्ये ८ हजार एकर अशी एकूण दहा हजार एकर जमीन यासाठी सरकारने संपादित केलेली आहे. भूसंपादनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. ऑरिकच्या शेंद्रा पट्ट्यात आतापर्यंत लहान, मोठ्या १९१ उद्योगांनी सुमारेे साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, यात मोठा प्रकल्प नसल्याने डीएमआयसीचा उद्देश सफल होत नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. जोपर्यंत डीएमआयसीमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करणारा मोठा प्रकल्प येणार नाही तोपर्यंत या वसाहतींसाठी शासनाने गुंतविलेल्या पैशांचे चीज होणार नाही. कोट्यवधी रुपये खर्चून शेंद्रामध्ये ऑरिकची टोलेजंग इमारत बांधण्यात आली. सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावरील काही जागा बँकेला भाड्याने देण्यात आली. इमारतीमधील ऑरिकचे कार्यालय सोडले, तर उर्वरित ८०टक्के इमारत विनावापर पडून आहे. ऑरिकमध्ये शासनाने केलेल्या गुंतवणुकीचा विचार करता तेथे लवकरात लवकर मोठी गुंतवणूक येणे अपेक्षित आहे. दावोस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक फोरममध्ये झालेल्या विविध कंपन्यांसोबतच्या सामंजस्य करारात छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीत गुंतवणूक आणण्यात शासनास यश आले नाही.
ऑरिकमध्ये गतवर्षी आलेले उद्योगकंपनीचे नाव ... किती जमीन घेतली..... किती गुंतवूणक करणार..कॉस्मो फिल्म.... १७० एकर.....१ हजार कोटींची गुंतवणूकपिरॅमल फार्मा.....१३८ एकर.... ५०० कोटी गुंतवणूकऑरिक ग्रीन सोल्यूशन.... ४५ कोटी रुपये गुंतवणूकफायटामॅटल कंपनी...... २४१ कोटी रुपयांची गुंतवणूक...