- प्रशांत तेलवाडकरछत्रपती संभाजीनगर : गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या वधू-वरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे १७ नोव्हेंबरपासून लग्नसराईच्या धामधूमीला सुरुवात होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात पंचागकर्तांनी १६ लग्नतिथी दिल्या आहेत. या मुहूर्तावर देशभरात तब्बल ४८ लाख लग्न लावण्यात येणार आहे. यातून ६ लाख कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी उभारी मिळणार आहे.
दिवाळीतील विक्रमी उलाढालीनंतर आता सर्व व्यापाऱ्यांचे लक्ष लग्न हंगामाकडे लागले आहे. चातुर्मास समाप्ती बुधवारी (दि. १३ नोव्हेंबर) आहे. आणि त्याच दिवशी तुलसी विवाहला सुरुवात होईल. तसेच, रविवारपासून (दि. १७ नोव्हेंबर) लग्न हंगामाचा प्रारंभ होईल. १५ डिसेंबर पर्यंत १६ लग्नतिथी आहेत. लग्न हंगामासंदर्भात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट)ने एक अहवाल जाहीर केला आहे. त्यात या १६ लग्नतिथीत देशभरात ४८ लाख लग्न होतील. त्यात ६ लाख कोटींची उलाढाल होणार असल्याचे म्हटले आहे.
लग्नात कशावर होईल किती खर्च ?टक्केवारी कशावर खर्च१५ टक्के--- दागिने१० टक्के--- वस्त्र, साडी व अन्य परिधान१० टक्के--- केटरिंग व अन्य सेवा.१० टक्के--- मंडप, सजावट७ टक्के--- अन्य सेवा, सुविधा६ टक्के--- अन्य वस्तू खरेदी५ टक्के--- इलेक्ट्रॉनिक्स, वीजेचे उपकरणे, कंज्युमर ड्युरेबल्स५ टक्के--- बॅंक्वेट हॉल, हॉटेल्स, मंगल कार्यालय.५ टक्के--- सुखामेवा, मिठाई, स्नेक्स५ टक्के--- किराणा आणि भाजीपाला४ टक्के--- भेटवस्तू४ टक्के--- फूल सजावट३ टक्के--- लाइट व साऊंड३ टक्के--- ऑर्केस्ट्रा३ टक्के--- प्रवास, परिवहन सेवा२ टक्के--- पत्रिका, फोटो, व्हिडीओ शूटिंग३ टक्के----इव्हेंट मॅनेजमेंट
प्रत्येक लग्नात किती होतो खर्चलग्नांची संख्या लग्नातील खर्च५० हजार --- १ कोटी रुपयांपेक्षा अधिक५० हजार--- ५० लाख रुपये७ लाख--- २५ लाख रुपये१० लाख--- १५ लाख रुपये१० लाख---१० लाख रुपये१० लाख--- ६ लाख रुपये१० लाख--- ३ लाख रुपये
२५ दिवसांत तयार झाला अहवालकॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटना दरवर्षी दिवाळी हंगामाचा अहवाल जाहीर करीत असते. यंदाही सर्व राज्यांतील राज्यस्तरीय व्यापारी संघटनांकडून अहवाल मागविण्यात आला. अहवाल तयार करण्यासाठी २५ दिवस लागले. मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान ११ मुहूर्त होते व ३५ लाख लग्न लागले. यातून ४.२५ लाख कोटींची उलाढाल बाजारपेठेत झाली होती. भारतीय अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यास लग्नसराईचा मोठा वाटा असतो. एका लग्नात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ४५० ते ४७५ लोकांना काम मिळते.- अजय शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट.
लग्नतिथीनोव्हेंबर : १७, १८, २२, २३, २४, २५.डिसेंबर : २, ३, ४, ५, ९, १०, ११, १३, १४, १५.