श्रीनिवास भोसले, नांदेडबारा वर्षापासून वाताचा त्रास असल्याने आई अंथरूणात़़़ वडील आॅटोचालक़़़़ घरची आर्थिक परिस्थीती हलाकीची़़़ स्वयंपाकासह धुणी, भांडी सर्व कामे तिलाच करावी लागत़़़ अशा प्रतिकुल परिस्थीतही संघना नरवाडे हीने केवळ मेहनत आणि विश्वासाच्या बळावर दहावीत ८९ टक्के गुण घेवून एक आदर्श निर्माण केला आहे़संघनाचे वडील प्रकाश नरवाडे हे आॅटो चालवून कुटुंबाचा गाडा हाकतात़ मिळणाऱ्या चार पैशातून त्यांना असणाऱ्या तीन मुलींचा शिक्षणाचा अन् बायकोच्या आजारपणाचा खर्च करावा लागतो़ मुळचे कळमनुरी तालुक्यातील दाती येथील नरवाडे कुटुंब उदरनिर्वाहासाठी नांदेड येथे भाड्याच्या खोलीत राहते़ संघनाला दोन बहिणी आहेत़ मोठी बहिण प्रेरणा ही यवतमाळ येथे फॅशन डिझायनिंग करते़ तर सर्वात लहाण प्रशिका ही आठवी वर्गात शिकते़ खासगी शिकवणी संघनाच्या लावणे शक्य नसतांनाही लेक शिकते हे पाहून संघनाच्या वडिलांनी पौळ सरांकडे तिला शिकवणी लावून दिली़ परंतु अचानक आईचा आजार वाढल्याने दवाखान्याच्या खर्चामुळे संघनाने शिकवणी बंद केली होती़ मात्र, ही परिस्थती प्राक़ैलास पौळ यांना माहिती झाल्यावर त्यांनी कोणतीही फी न घेता तिला शिक्षण दिल्याचे संघनाने सांगितले़ माझ्या यशात प्रा़ पौळ सरांबरोबरच आई-वडील, आजी, बहिणी आणि माझ्या प्रतिभा निकेतन शाळेच्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे़ पुढील शिक्षणासाठी यशवंतमध्ये प्रवेश घ्यायचा असून डॉक्टर होण्याचा तीचा मानस आहे़ घरची परिस्थिती अतियश बिकट तरीही विश्वासाच्या बळावर मला न्युरो सर्जन व्हायचं, असे अभिमाने सांगताना संघना नरवाडेचे डोळे भरून आले होते़ डॉक्टर झाल्यावर ग्रामीण भागातील गरिब लोकांची सेवा करण्याचा मानसही तिने यावेळी व्यक्त केला़ आई-वडीलांच्या डोळ्यात तरले अश्रूमी आजारी असल्याने नेहमीच अंथरूणात असते़ नको त्या वयात मुलीवर घरकामाची जबाबदारी पडली़ घरातील सर्व कामे तिलाच करावी लागतात़ संघनाच्या परीक्षेच्या काळात माझी प्रकृती जास्त बिघडली़ संघनाने रात्ररात्र जागून माझ्या हातापायाला तेल लावून देत अभ्यास केला़ माझ्या आजारामुळे तिचे मार्क कमी झाले, असे सांगताना संघनाच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळले़
आॅटोचालकाच्या मुलीला व्हायचय न्युरो सर्जऩ़़
By admin | Published: June 18, 2014 1:16 AM