आनंद इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून ऋषिकेश मागील अनेक वर्षांपासून ३१ मार्च जवळ येताच लोकांची होणारी त्रेधातिरपिट बघत आहेत. जेव्हा अगदी शेवटच्या क्षणी लोक गुंतवणुकीसाठी येतात, तेव्हा उत्तम गुंतवणुकीसाठी खूपच कमी पर्याय उपलब्ध असतात. यामुळे अनेकांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठीच ऋषिकेश यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच स्मार्ट गुंतवणूक कशी करता येईल, याबाबत ‘लोकमत’च्या वाचकांशी साधलेला हा संवाद.
चौकट :
१. सुरुवातीपासूनच करा गुंतवणुकीचे नियोजन
गुंतवणुकीची प्रमाणपत्रे सादर करण्याची सूचना जेव्हा कंपनीकडून किंवा सीएकडून येते, तेव्हा गुंतवणुकीचे नियोजन करण्याची सवय सोडून द्या. कारण जेव्हा ऐनवेळी एक - दीड लाख किंवा त्यापेक्षाही मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्याची वेळ येते, तेव्हा एवढी मोठी रक्कम कुणाकडेही नसते. त्यामुळेच जर नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक केली, तर ऐनवेळी आर्थिक टंचाई निर्माण होत नाही. तसेच टॅक्स वाचण्वियासाठी गुंतवणुकीचे पर्यायही आपण बारकाईने अभ्यासले पाहिजेत. उदा. सेक्शन ८० सी मध्ये ट्युशन फीस, हाऊसिंग लोन प्रिंसीपल, स्टॅम्प ड्युटी यासारखे पर्याय येतात. सेक्शन ८० डी मध्ये स्वत:साठी आणि कुटुंबासाठी भरलेला हेल्थ इन्शुरन्स येतो आणि त्यामुळेही सवलत मिळू शकते. त्याचप्रमाणे सेक्शन ८० सीसीडी असतो. हा खूप कमी लोकांना माहिती असून यामध्ये नॅशनल पेन्शन स्कीम येते. याचा एकमेव तोटा असा आहे की, याअंतर्गत गुंतवलेली तुमची रक्कम तुमच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत काढता येत नाही. त्यानंतर तुम्ही ६० टक्के रक्कम काढू शकता. उर्वरित ४० टक्के रक्कम तुम्हाला केवळ पेन्शन स्वरूपातच मिळू शकते. हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये येणाऱ्या लोकांनी याचा वापर करावा.
चौकट :
२. तुम्हाला पुरेसे विमा संरक्षण आहे का ?
अजूनही बरेचजण विम्याकडे खर्च म्हणून पाहतात. त्यामुळे विम्याची रक्कम किती मिळणार, यापेक्षा हप्ता कसा कमीत कमी येईल, याकडेच आपले लक्ष असते. हे अतिशय चूक आहे. पुढीलपैकी तीन विम्यांचे संरक्षण प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.
ए. टर्म प्लान- याअंतर्गत विम्याचे संरक्षण घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मोठी रक्कम मिळते, जेणेकरून कुटुंबाचे उर्वरित खर्च भागू शकतात. यासाठी अत्यंत कमी हप्ता येतो. उदा. ३० वर्षे वयाच्या व्यक्तीने जर १ कोटी रुपयांचा टर्म प्लान घेतला, तर त्याचा वार्षिक हप्ता केवळ १३ ते १५ हजार येऊ शकतो. त्यामुळे ५ ते १० लाखांची एखादी पॉलिसी घेण्यापेक्षा मोठ्या रकमेचा टर्म प्लान घेतला, तर तो तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांचा आर्थिक भार नक्कीच उचलू शकेल.
बी. मेडिक्लेम-
एकदा दवाखान्यात दाखल झाल्यावर किती खर्च येतो, हे आज आपण कोरोनामुळे अनुभवतोच आहोत. त्यामुळे कमी रकमेचा मेडिक्लेम घेणे फायदेशीर ठरत नाही. साधारण पस्तिशीच्या वयातले पती - पत्नी आणि त्यांची दोन मुले यांचा १० लाखांचा मेडिक्लेम करण्यासाठी साधारणपणे १८ ते २२ हजार रुपये एवढा मासिक खर्च येतो. पण मिळणाऱ्या फायद्यासमोर ही रक्कम खूपच कमी ठरते. मेडिक्लेम पॉलिसी गुंतवणूक सल्लागाराकडून काढणे कधीही चांगले. जेणेकरून गरज पडल्यास तुमचे क्लेम सेटल करण्यासाठी त्याची नक्कीच मदत होऊ शकेल.
सी. पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी
अपघातामुळे येणारे कायमचे अपंगत्वही तुमचे उत्पन्न थांबवू शकते. यासाठी या प्रकारचा विमा उपयुक्त ठरतो. हा विमा कायमचे किंवा काही काळापुरते येणारे अपंगत्व, आर्थिक नुकसान, मृत्यू या घटनांपासून विमा संरक्षण देतो. याअंतर्गत ६ हजार रुपये एवढ्या कमी हप्त्यामध्ये ५० लाखांचेही विमा संरक्षण मिळू शकते. विम्याची संपूर्ण सुरक्षा मिळण्यासाठी हा विमा प्रत्येकाने काढावा.
चौकट :
३. तुमच्या खर्चाची नोंद ठेवा
कितीही 'ओल्ड फॅशन' वाटत असले तरीही, प्रत्येकाने आपल्या महिन्याचा खर्च एका वहीत लिहून ठेवण्याची सवय लावावी. यामुळे आपल्या गरजा आणि त्याव्यतिरिक्त होणारा अवास्तव खर्च याचा अंदाज येईल आणि आपोआपच अवास्तव खर्च नियंत्रणात येतील.
चौकट :
४. ध्येय ठरवून गुंतवणूक
दुसऱ्यांनी अवलंबिलेले गुंतवणुकीचे पर्याय पाहून किंवा ऐकून तुम्ही तुमची गुंतवणूक करू नका. तुमची उद्दिष्टे काय आहेत, ती आधी लक्षात घ्या आणि उद्दिष्टांची परिपूर्ती करण्याच्या हिशेबाने गुंतवणूक करा. तीन वर्षांनंतर गाडी घेणे असो किंवा निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग असो, गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे ध्येय अवश्य ठरवा.
चौकट :
५. अकस्मात निधीची सोय करा
कधीही आपले उत्पन्न थांबू शकते, हे कोरोनामुळे आपण अनुभवतोच आहोत. त्यामुळे अशा काळात उपयुक्त ठरण्यासाठी कंटींजन्सी किंवा इर्मजन्सी फंड म्हणजेच अकस्मात निधीची सोय करून ठेवणे गरजेचे बनले आहे. कमीत कमी सहा महिने आपला घरखर्च भागवू शकेल, एवढा निधी याअंतर्गत लिक्वीड फंडमध्ये किंवा बँकेत मुदत ठेव स्वरूपात गुंतवावा.
चौकट :
६. तुमच्या कर्जाचा व्याजदर तपासून पाहा
प्रत्येकावरच आज कुठले ना कुठले कर्ज आहे. हे कर्ज आपल्याला खरंच परवडते आहे का, यापैकी गुड लोन आणि बॅड लोन कसे ओळखायचे, हे प्रत्येकाला उमगले पाहिजे.
- क्रेडिट कार्ड लाेन- क्रेडिट कार्डपासून मिळणारे फायदे अवश्य घ्यावेत. पण आपण एरवी जी गोष्ट सहजपणे घेऊ शकत नाही, ती गोष्ट घेण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरणे घातक ठरू शकते. आपल्याला झेपेल तेवढीच त्याची खर्चाची मर्यादा ठेवावी.
- पर्सनल लोन- हे कर्ज बहुतांश लोक घेतात. पण यासाठी आपल्याला तब्बल १६ ते २० टक्के एवढ्या दराने व्याज लागते आणि त्याला प्रीपेमेंट फीसदेखील लागते, हे अनेकांना ठावूक नसते. त्यामुळे हे कर्ज कधीही वापरू नये.
- कार लोन - कार घेण्याचे स्वप्न साकारताना २५ - ५ - १० हे सूत्र नेहमी लक्षात ठेवावे. याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही कारच्या रकमेच्या २५ टक्के रक्कम डाऊन पेमेंट करू शकत असाल, कारचे हप्ते ५ वर्षातच फेडता येऊ शकत असतील आणि कारचा हप्ता हा तुमच्या मासिक किंवा वार्षिक उत्पन्नाच्या १० टक्के एवढाच येत असेल, तर कार लोन घेणे आपल्याला परवडते आहे, हे लक्षात घ्यावे.
- गृह कर्ज - वरील सर्व कर्जांपैकी हे कर्ज सगळ्यात चांगले आहे. यामुळे कर सवलतही मिळते, तसेच व्याजदर कमी असतो. पण हे कर्ज कधीही आपल्याला डोईजड ठरणार नाही, याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर हे कर्ज फेडण्याचा विचार करावा.
चौकट :
७. तज्ज्ञांची मदत घ्या
फॅमिली डॉक्टरप्रमाणे आता फॅमिली गुंतवणूक सल्लागार असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य गुंतवणूक करा. कारण गूगल हे केवळ एक यंत्र असून ते तुमच्या भावना, आर्थिक गरजा कधीच ओळखू शकत नाही.
चौकट :
तुमचा पोर्टफोलियाे मोफत तपासण्याची संधी
तुमची आर्थिक गुंतवणूक योग्य पद्धतीने होते आहे, की त्यात कोणते बदल आवश्यक आहेत, हे मोफत जाणून घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुमचा आताचा पोर्टफोलियाे crm@anandinvestment.in या मेलवर पाठवा आणि तज्ज्ञांचे मत जाणून घ्या.
संपर्क-
आनंद इन्व्हेस्टमेंट
२४५, पहिला मजला, ग्रीन लीफ हॉटेलच्या वर, ऑगस्टस हाेमच्या समोर, उल्कानगरी, औरंगाबाद.
दू. क्र.- ९८२३४४०७१०