शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

‘मतांचं विभाजन टाळा... भाजप-सेनेला पाडा’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 11:36 PM

औरंगाबाद : ‘लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी ही घोषणा होईल. त्यादृष्टीने कामाला ...

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : राजीव गांधी स्टेडियमवरील जाहीर सभेत आवाहन

औरंगाबाद : ‘लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी ही घोषणा होईल. त्यादृष्टीने कामाला लागा. मतांचं विभाजन टाळा आणि भाजप- सेनेला पाडा,’ असे कळकळीचे आवाहन आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.ते राजीव गांधी स्टेडयमवरील जाहीर सभेस संबोधित करीत होते. तब्बल अर्धा-पाऊण तासाच्या भाषणात चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका केली.हात जोडून विनंतीभाषणाच्या शेवटी अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना उद्देशून ते म्हणाले की, ‘वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भाजपला मदत होईल, असे काही करू नका. कृपया आपण सर्व जण एकोप्यानं राहूया. केवळ ३० टक्के मतांवर भाजपचं सरकार आलेलं आहे. उर्वरित ७० टक्के मते आता एकसंध राहिली पाहिजेत. मतांचं विभाजन टाळावं यासाठीच मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्या घरी एकदा नव्हे, तर पाच वेळा गेलो. तशी जागावाटपाचीही फार मोठी गोष्ट नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे खासदार बनावेत, ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे, असे त्यांनी जाहीरपणे नमूद केले.काँग्रेस आरएसएसच्या बाजूचा कसा असू शकतो?सभा संपल्यानंतर माध्यमांनी विचारले असता, अशोक चव्हाण यांनी सवाल उपस्थित केला की, काँग्रेस आरएसएसच्या बाजूचा कसा असू शकतो? काँग्रेस आरएसएसच्या विरोधात काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. महात्मा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसची आरएसएसविरोधी भूमिका स्पष्टपणे राहत आली आहे. त्यामुळे काँग्रेसची आरएसएसच्या संदर्भात लेचीपेची भूमिका असण्याचे कारणच नाही. उलट प्रकाश आंबेडकर यांच्यासह आरएसएसविरोधी सर्व शक्तींनी एकत्रित येण्याची आणि आरएसएसविरोधी लढा उभा करण्याची गरज आहे.प्रकाश आंबेडकर यांच्या निरोपाची वाट पाहत आहोत. त्यांचा निरोप येत नसल्याने काँग्रेस- राष्टÑवादीचे उमेदवार जाहीर करावयाचे थांबले आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.संविधान बचाव... देश बचाव अशी घोषणा यावेळी माजी खा. एकनाथ गायकवाड यांनी दिली. बाबा सिद्दीकी यांनी ‘हमने बिखर के खुदको तमाशा बना दिया’ अशी आठवण करून दिली. आ. सुभाष झांबड यांनी मनपाच्या कारभारावर सडकून टीका केली. नामदेव पवार यांचेही घणाघाती भाषण झाले. त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री... अशोक चव्हाण’ आणि या राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा... अशोक चव्हाणांसारखा’ अशी घोषणा उपस्थितांकडून वदवून घेतली. प्रारंभी अशोक चव्हाण यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. आज माता रमाई यांची जयंती असल्याने त्यांनाही अभिवादन करण्यात आले.अशोक चव्हाण येण्यापूर्वी, मिलिंद पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, रेखा जैस्वाल, बाबा तायडे, डॉ. पवन डोंगरे, रवींद्र बनसोड, विलासबापू औताडे, इब्राहिम पठाण, केशवराव पा. तायडे आदींची भाषणे झाली. मंचावर माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील, प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सुनीता तायडे- निंबाळकर, सचिव मीनाक्षी बोर्डे- देशपांडे, मोटेभाभी, अशोक सायन्ना, नारायणअण्णा सुरगोणीवार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.अब की बार... आपटी मार..अबकी बार बस कर यार, अबकी बार काँग्रेस सरकार, अबकी बार आपटी मार, असे घोषवाक्य अशोकराव चव्हाण सादर करीत होते, तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. मराठवाडा पोरका झाला आहे. पालकमंत्री फक्त झेंडावंदनाच्या वेळेस येतात. एरव्ही मराठवाड्याच्या हालअपेष्टा बघायला कुणाजवळ वेळ नाही. मुख्यमंत्र्यांना तर अजिबात वेळ नाही. कारण ते क्रिकेट खेळण्यात आणि विरोधकांना कुत्रे- मांजरे अशी उपमा देण्यात दंग आहेत; पण हेच कुत्रे-मांजरे यांच्या गळ्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. लोकांना पाहिजेत चारा छावण्या आणि यांनी सुरू केल्या डान्सबार लावण्या या त्यांच्या वाक्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. मराठा आरक्षण ही काही सरकारची मेहरबानी नाही. त्यासाठी सकल मराठा समाजाला दबाव निर्माण करावा लागला. ५८ मोर्चे काढावे लागले; पण लागू झाले का मराठा आरक्षण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :PoliticsराजकारणAshok Chavanअशोक चव्हाण