औरंगाबाद : औरंगाबादमध्ये ऑईल डेपो उभारण्यासाठी एक अभ्यास समिती तयार करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात समितीकडून अहवाल प्राप्त होईल, त्यानंतर डेपोसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती इंडियन ऑईलचे महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक अमिताभ अखौरी यांनी दिली.
इंडियन ऑईल तर्फे आयोजित पत्रपरिषदमध्ये ते बोलत होते. अखौरी यांनी सांगितले की, पूर्वी या शहरात ऑईल डेपो होता. पण तांत्रिक कारणामुळे तो येथून हटविण्यात आला. ऑइल डेपोसाठी मोठी व सुरक्षित जागा लागते. सर्वांगाने समिती अभ्यास करत आहे. औरंगाबादमध्ये डेपो झाला तर त्याचा फायदा मराठवाड्याला होईल, असेही त्यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले की, इंडियन ऑईलतर्फे देशात ३३६ विविध प्रकल्पात मिळून १.०८ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. त्यापैकी त्यापकी २.६७४ कोटींचा खर्च झाला आहे. आर्थिक वर्ष २०२०-२०२१ दरम्यान महाराष्ट्रात विविध योजनेसाठी ८५५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. यातून मनमाड ते सोलापूर दरम्यान इंधन पाईल लाईनसह इंधन डेपोची क्षमता दुप्पट करण्यात येणार आहे. या पाईप लाईन दरम्यान इंधनाचा तुटवडा पडू नाही म्हणून नगर व सोलापूर येथे इंधन टॅंक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या लाईन दरम्यान इंधनाचा तूटवडा पडू नयेत यासाठी नगर, सोलापूर येथे इंधन टॅक उभे करणार आहेत. याशिवाय नागपूर येथे तसेच नागपूर येथे गॅस रिफिलिंग प्लांटचे काम सुरु आहे. हा प्रकल्प ४०० कोटी रुपयांचा आहे. इंडियन पेट्रोलचे महा व्यवस्थाक अजयकुमार श्रीवास्तव, संजय झा यांची उपस्थित होती.