शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

विद्यापीठाच्या 'पेट' ची प्रतीक्षा; ३,१६४ विद्यार्थ्यांना मिळू शकते पीएचडी संशोधनाची संधी

By योगेश पायघन | Updated: March 4, 2023 07:35 IST

दोन वर्षांपूर्वी झाली होती परीक्षा,राज्यात सर्वाधिक विद्यार्थी विद्यापीठात संशोधन करत आहे.

- योगेश पायघनछत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जानेवारी आणि मार्च २०२१ नंतर पीएच.डी प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) पार पडली. सध्या १७८ संशोधन केंद्रावर सात हजार ७४४ विद्यार्थी संशोधन करत आहेत. तर अजूनही १,६४० गाईड्सकडे ३,१६४ विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी आहेत. मात्र, दोन वर्ष सरले अद्याप पेट परीक्षेच्या हालचाली नाहीत. त्यामुळे पीएच.डी संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेट परीक्षा घ्या, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून जोर धरत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट (पेट पेपर पहिला व दुसरा) जानेवारी व मार्च २०२१ महिन्यात घेण्यात आली होती. ४५ विषयांसाठी झालेल्या पेट परीक्षेत चार हजार २९९ पात्र ठरले होते. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र सेट, नेट, एम.फिल आदी विद्यार्थ्यांची सप्टेंबर २०२१ मध्ये संशोधन अधिमान्यता समितीने (आरआरसी) समोर सादरीकरण झाले. तर प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात करण्यास जानेवारी २०२२ उजाडला. सध्या सात हजार ७४४ विद्यार्थ्यांची पीएच.डी. संशोधनासाठी सध्या नोंदणी आहे. राज्यात सर्वाधिक विद्यार्थी विद्यापीठात संशोधन करत आहे.

कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी कालमर्यादेत संशोधन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विद्यापीठाने स्वत:चे साॅफ्टवेअर युनिककडून विकसित करून घेतले. प्रत्येक संशोधनाची अपडेट स्थिती त्याद्वारे कळत आहे. त्याशिवाय बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. शहरात ५८ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९३ संशोधन केंद्र आहेत. त्यापैकी ४४ केंद्र विद्यापीठातील विभागात आहेत. बीडमध्ये ४१, जालना जिल्ह्यात ३०, धाराशिव येथे १४ असे एकूण १७८ संशोधन केंद्रांवर सध्या १,६४० गाईडच्या मार्गदर्शनात संशोधन सुरू आहे.

आढाव्याला सुरुवात... नव्या नियमानुसार होईल पेटयुजीसीच्या नव्या नियमानुसार पीएच.डी संशोधनासाठी विद्यापीठाचे नवे नियम तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही विषयांच्या अडचणी होत्या त्या दूर केल्या. विभागनिहाय पीएच.डीचा आढावा सुरू केला आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच नव्या नियमानुसार पुढील पेट परीक्षा घेतली जाईल.- डाॅ. श्याम शिरसाठ, प्रकुलगुरू, डाॅ. बा.आं.म.वि. छत्रपती संभाजीनगर

विद्यापीठ कार्यक्षेतालील पीएच.डी संशोधन स्थितीशाखा - गाईड- संशोधक नोंदणी- पूर्णवेळ- अर्थवेळ- रिक्त जागाविज्ञान व तंत्रज्ञान- ५२२ - २५०९ - १,५६९ - ९४० - १,१८२आंतरविद्याशाखीय अभ्यास - १९३ - १,१४४ - ७७१ - ३७३ - २൦२मानव्यविद्या - ८१४ - ३,३७४ - २,४८८ - ८८६ - १,६११वाणिज्य व व्यवस्थापन - १११ - ७१७ - ५२८ - १८९ - १७४

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी