लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र चॅप्टर आॅफ इंडियन असोसिएशन आॅफ पेडियाट्रिक सर्जन्सच्या पंधराव्या परिषदेत राज्यभरातून आलेल्या डॉक्टरांनी आपले अभ्यासपूर्ण शोधनिंबध सादर केले. यात मुंबईच्या डॉ. सौंदर्या यांनी सादर केलेल्या दुर्मिळ आजारावरील शोधनिबंधास प्रथम पुरस्कार मिळाला.बालशल्य शस्त्रक्रिया या क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र चॅप्टर आॅफ इंडियन असोसिएशन आॅफ पेडियाट्रिक सर्जन्सच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले, तसेच काही विद्यार्थ्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व संदर्भासह शोधनिबंध सादर केले. डॉ. सौंदर्या यांना प्रथम, डॉ. तरुण गुप्ता यांना द्वितीय, तर तृतीय पुरस्कार डॉ. सौरभ तिवारी व डॉ. मृदुल तांतिया यांना विभागून देण्यात आला. नवजात बालकांच्या पोटातील अनेक मोठे आतडे आकाराने लहान असणे. यामध्ये आतडे इतके लहान असतात की, ज्यातून मल पुढे जाऊ शकत नाही. हा आजार बालकाच्या जिवावरही बेतू शकतो. या अत्यंत दुर्मिळ आजारावरील शोधनिबंध डॉ. सौंदर्या यांनी सादर केला. अभ्यासपूर्ण सादरीकरण आणि डॉक्युमेंटेशनमुळे अनेक डॉक्टर्स व ज्युरी मंडळही प्रभावित झाले. यावर अद्याप शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध होऊ शकलेला नसल्याचे डॉ. आर. जे. तोतला यांनी सांगितले. आगामी काळात अशा प्रकारच्या जटिल आणि अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.शोधनिबंध सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांची नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्याची उत्सुकता पाहून अनेक ज्येष्ठ तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले.
उत्कृष्ट शोधनिबंधास पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:34 AM