लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या नामविस्तार दिनानिमित्त गुरुवारी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेतील २७ गुणवतांना सुवर्णपदकांचे वितरण करण्यात आले.
विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमात समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे व कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरु डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये मारोती खरात (कुलपतींचे सुवर्णपदक, लक्ष्मीबाई जाधव सुवर्णपदक, एम. ए. मराठी) याला दोन सुवर्णपदके, मयुरी निकम, प्रगती कोरडे (एम. ए. इंग्रजी), अनिता रायमल (बी.ए. इंग्रजी) हिला दोन सुवर्णपदके, आरती घुगरे (बी. एस्सी.), अजित वावरे (एम. एस्सी. रसायनशास्त्र), सुमेध चव्हाण (एम. एस्सी. वनस्पतीशास्त्र) याला दोन सुवर्णपदके, मनोहर मस्के (संख्याशास्त्र) याला दोन सुवर्णपदके, ज्ञानेश्वर तोंडे (गणित), भैयासाहेब गायकवाड (संगणकशास्त्र), शिवकन्या आवाड (जीव रसायनशास्त्र), प्रतीक डाके (एमबीए) याला दोन सुवर्णपदके, रिध्देश काथार (बी. ई. मेकॅनिकल), अक्षिता मुसांडे (बी. ई. केमिकल), स्मिता रातवाणी (बी. कॉम.), अखिल कैद फादल अली (एम. कॉम.), अदित्य शिंदे (एलएलएम) यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले, तर शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमात मेराज फातेमा, धनश्री वरकड आणि रामशा इफ्त सय्यद कलीमोद्दीन या तिघांना विभागून सुवर्णपदक देण्यात आले.
चौकट....
‘लोकमत’ सुवर्णपदकाची मानकरी ऐश्वर्या टाक
वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमामध्ये (बीजे) प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी जाहीर केलेले ‘लोकमत सुवर्णपदक’ देऊन विद्यापीठातर्फे गौरविले जाते. यंदा जयसिंगपुरा येथील सिद्धार्थ कॉलेज ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सच्या ऐश्वर्या टाक या विद्यार्थिनीला या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.