- वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी.मांगदरे..
सिल्लोड : लेण्यांच्या पायथ्याशी दोन दिवसांपूर्वी दोन बिबट्यांनी दर्शन दिले होते. याप्रकरणी अजिंठा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. मांगदरे यांनी लेणी परिसरात जाऊन तेथे वास्तव्यास असलेल्या कर्मचारी व पर्यटकांना काय सावधगिरी बाळगावी, याबाबत मार्गदर्शन केले.
अजिंठा लेण्यांच्या डोंगरात अनेक वन्यप्राणी वास्तव्यास आहेत. अनेक दिवसांपासून अजिंठा लेणी बंद होती, त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट असल्याने अनेक वन्यप्राणी लेणी परिसरात फिरकत होते. लेण्यांच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिबटे पर्यटकांना दर्शन देतात. मात्र, अद्यापपर्यंंत कुणालाही इजा केलेली नाही. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. मांगदरे, वनपाल एन. डी. काळे, वनरक्षक जीवन दांडगे, शेख फकिरा यांनी लेणी परिसरात जाऊन बिबट्याच्या पायांचे ठसे घेतले. डोंगरातून हे बिबटे शिकारीच्या शोधार्थ येथे आले होते. रात्री-अपरात्री वन्यप्राणी आले, तर काय काळजी घ्यावी, याबाबत वन विभागाच्यावतीने लेणी परिसरात जनजागृती करण्यात आली. पुरातत्व विभागाचे अधीक्षक डी. एस. दानवे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी पिंजरा लावण्यास नकार दिला आहे, यामुळे आम्ही तेथे पिंजरा लावला नसल्याचे मांगदरे यांनी सांगितले.
फोटो :
210621\img_20210621_183110.jpg
कॅप्शन...
अजिंठा लेणीत जनजागृती करताना वनविभागाचे, व पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पर्यटक दिसत आहे