-
वळदगावात कोविड लसीकरण सुरू
वाळूज महानगर : वळदगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, सरपंच अमर डांगर, उपसरपंच संजय झळके, वैद्यकीय अधिकारी डॉ.संग्राम बामणे, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पालवे आदींची उपस्थिती होती.
------------------------
वाळूज महानगरातील इमाम व मौलवींना मार्गदर्शन
वाळूज महानगर : वाळूज महानगरातील विविध मशिदीचे इमाम, मौलवी व कमिटी सदस्यांची आज सोमवारी (दि.१९) एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत रमजाननिमित्त मुस्लीम बांधवांनी कोरोनाचे संकट लक्षात येऊन घरच्या घरी रोजा इफ्तार, नमाज व तरावीहची नमाज अदा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी केले. यावेळी मुस्लीम बांधवांनी शासन व पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार रमजान महिन्यातील धार्मिक कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरे करण्याचा संकल्प केला आहे.
-----------------------------
बजाजनगरात लॉकडाऊनमुळे शुकशुकाट
वाळूज महानगर : बजाजनगरात लॉकडाऊनमुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. येथील मोहटादेवी चौक, महाराणा प्रताप चौक, मोरे चौक आदी ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडत असते. मात्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असल्याने व कोरोनाच्या भीतीने नागरिकही घराबाहेर पडत नसल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.
---------------------------
तीसगाव-वडगाव रस्ता बनला धोकादायक
वाळूज महानगर : तीसगाव-वडगाव या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन कानाडोळा करीत असल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून, रात्रीच्यावेळी ये-जा करणारे वाहने खड्ड्यात आदळून नादुरुस्त होत असतात. या शिवाय रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना पंढरपूरमार्गे वळसा टाकून ये-जा करावी लागत आहे.
----------------------------------