शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

भयंकर ! मोकाट कुत्र्यांनी वर्षभरात ५ हजार नागरिकांचे लचके तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 7:31 PM

महापालिका मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करायला तयार नाही.

ठळक मुद्देदररोज किमान दहा ते पंधरा नागरिकांना मोकाट कुत्रे चावा घेतातशहरात मोकाट कुत्र्यांची संख्या पन्नास हजारांपेक्षा अधिक झाली आहे.

औरंगाबाद : जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांत शहरात पाच हजारांपेक्षा अधिक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. गुरुवारी कटकट गेट भागातील युनूस कॉलनी येथे मोकाट कुत्र्यांनी लहान मुलाचे लचके तोडले. अशा परिस्थितीत महापालिका मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करायला तयार नाही.

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या पन्नास हजारांपेक्षा अधिक झाली आहे. दररोज किमान दहा ते पंधरा नागरिकांना मोकाट कुत्रे चावा घेतात. मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांना टार्गेट केले आहे. मोकाट कुत्र्याने चावा घेतल्यानंतर महापालिकेच्या एकाही दवाखान्यात रेबीजची लस उपलब्ध होत नाही. सर्व नागरिकांना घाटी रुग्णालयातच धाव घ्यावी लागते. शहरातील नागरिकांना आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी महापालिकेवर असली तरीही कुत्रा चावल्यानंतर नागरिकांना नाईलाजाने घाटी रुग्णालयातच धाव घ्यावी लागते.

जानेवारी ते डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घाटी रुग्णालयात कुत्रा चावल्यानंतर ५ हजार ३४८ नागरिकांवर उपचार करण्यात आले. यामुळे दिवसेंदिवस घाटी रुग्णालयावरील ताण वाढत आहे. शहरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक कमालीचे वैतागले आहेत. घराच्या आसपास लहान मुलांना खेळायला सोडणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखा प्रकार होत आहे. पालकांकडून या घटनेबाबत चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महापालिकेकडून खाजगी एजन्सीच्या सहकार्याने मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.

रात्री नागरिकांना वाहन चालविणे अवघडमध्यवर्ती जकात नाका, पुंडलिकनगर, बायजीपुरा, औरंगपुरा भाजी मंडई, बारुदगर नाला, जळगाव रोड अशा वेगवेगळ्या भागांत मोकाट कुत्र्यांचे साम्राज्य आहे. रात्री १२ वाजेनंतर नागरिकांना वाहन चालविणे अवघड जाते. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जातात.

कुत्र्यांची पिल्ले दत्तक देण्याचा उपक्रममहापालिकेकडून सध्या कुत्र्यांची पिल्ले दत्तक देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मागील दोन ते तीन महिन्यांत जवळपास दोनशे कुत्रे दत्तक देण्यात आले. पडेगाव भागात कुत्र्यांवर नसबंदी करण्यासाठी अद्ययावत दवाखाना उघडण्यात येत असल्याची माहिती डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाdogकुत्रा