औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारदिनी १४ जानेवारी रोजी ब्रिजवाडी येथे झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीत मानाच्या कुस्तीत हर्सूलचा अजहर पटेल व आडूळचा रफिक पठाण संयुक्त विजेते ठरले.कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन बाळासाहेब सानप, नगरसेवक राजू शिंदे, गोकुळ मलके, माजी नगरसेवक भगवान रगडे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाले यांच्या हस्ते कुस्ती लावून करण्यात आले. मानाची कुस्ती अजहर व रफिक यांची उशिरापर्यंत दोघांचाही अर्धा तास संघर्ष सुरू राहिला; परंतु दोघेही तोडीचे पहिलवान असल्याने पंचकमिटीने अखेर ही कुस्ती बरोबरीत सोडविली. वेणूबाई कुंडलिक हिवराळे, तसेच सांडुजी हिवराळे यांच्या स्मरणार्थ मायादेवी बहुउद्देशीय सेवाभावी विकास संस्था व नेहरू युवा केंद्राच्या वतीने ढाल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्सव समितीच्या वतीने रोख बक्षीस देऊन पंचायत समिती सदस्य कल्याण गायकवाड, आ. सुभाष झांबड, कलीम कुरेशी, रुंजाजी जाधव आदींच्या वतीने सत्कार करण्यात आला. कुस्त्यांची दंगल यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मिलिंद निकाळजे, काकासाहेब पट्टेकर, बाबासाहेब नरवडे, गणेश साबळे, रावसाहेब हिवराळे, अनिल भुईगड, कृष्णा पाखरे, सुनील गडवे, आलमनूर पठाण, श्रीकांत हिवराळे, अण्णासाहेब पाखरे, अंबादास जाधव, जितू जाधव, योगेश हिवराळे, अंबादास घागरे, जनार्दन पवार, सुभाष हिवराळे, रामेश्वर निकाळजे, सुनील भुईगड, राहुल पट्टेकर, सुरेश मगरे, अक्षय हिवराळे आदींनी घेतले.
कुस्त्यांच्या दंगलीत अजहर पटेल, रफिक पठाण संयुक्त विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:33 AM