लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डिसेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनात विविध आमदारांकडून शासनाला कोंडीत पकडणारे प्रश्न विचारण्यात येतात. या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मंत्रिमहोदयांना अचूक आणि नेमकी माहिती पुरविण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली.याविषयी अधिक माहिती अशी की, डिसेंबर महिन्यात राज्य विधान मंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे. या अधिवेशनाची तयारी शासनाकडून केली जाते. अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य मंत्रिमहोदयांना त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करून माहिती विचारतात. आमदारांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना अचूक उत्तर देण्याची जबाबदारी संबंधित खात्याच्या मंत्र्याची असते. आमदारांकडून विचारण्यात येणाºया तारांकित प्रश्नांसंदर्भात संबंधित विभागाच्या ज्या कार्यालयाकडे माहिती असते, त्या कार्यालयाच्या प्रमुखांना तो प्रश्न (पान २ वर)
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठाण्यात स्वतंत्र पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:04 AM