शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

मागासवर्गीय आयोगाचा दणका; अनुदानित शाळेने घेतलेले नियमबाह्य शुल्क केले परत

By विजय सरवदे | Published: December 16, 2022 8:02 PM

५७ विद्यार्थिनींकडून घेतले होते १ लाख ३१ हजार रुपये

औरंगाबाद : अनुदानित शाळा असतानाही शारदा मंदिर कन्या प्रशालेने ५७ मागासवर्गीय विद्यार्थिनींकडून नियमबाह्य शैक्षणिक शुल्क व संगणक शुल्क वसूल केले होते. ही बाब अनुसूचित जाती, जमाती आयोगाने गांभीर्याने घेत वसूल केलेले शुल्क परत करण्याचे आदेश स. भु. शिक्षण संस्थेला दिले होते. त्यानुसार संस्थेने बुधवारी १ लाख ३१ हजार रुपयांचे शुल्क संबंधित विद्यार्थिनींना परत केले.

यासंदर्भात स्वाभिमानी मराठवाडा युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गौतम आमराव यांनी अनुसूचित जाती, जमाती आयोगाकडे तक्रार केली. आयोगाच्या सूचनेनुसार माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यात तथ्य आढळल्याचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी आयोगाकडे सादर केला. यासंदर्भात मुंबईत आयोगाने २८ सप्टेंबर रोजी संबंधित मुख्याध्यापिका, तक्रारदार आणि शिक्षणाधिकारी यांची सुनावणी घेतली.

सुनावणीनंतर आयोगाच्या आदेशाचे संस्थेने पालन केले नाही. त्यामुळे स्वाभिमानी मराठवाडा युवक प्रतिष्ठानने ही बाब पुन्हा आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आयोगाने शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापिका व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम आमराव यांना ८ डिसेंबर रोजी सुनावणीसाठी बोलावले. तेव्हा मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनींकडून जबरदस्तीने व नियमबाह्य वसूल केलेले शुल्क परत करण्याची लेखी स्वरूपात ग्वाही दिली होती. आयोगाने दिलेल्या आदेशाची माहिती मुख्याध्यापिकेने संस्थेचे संचालक मंडळाला कळविल्यानंतर १३ व १४ डिसेंबर रोजी शाळेने ५७ विद्यार्थिनींकडून वसूल केलेले एकूण १ लाख ३१ हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले.

शाळेची सपशेल माघारसदरील शाळा ही शंभर टक्के अनुदानावर असतानादेखील इयत्ता ५ वीच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’ या पाच तुकडींमध्ये शिक्षण घेतलेल्या अनुसूचित जातीच्या एकूण ५७ विद्यार्थिनींकडून स्वेच्छानिधीपोटी ३०० रुपये, परीक्षा शुल्कापोटी ५०० रुपये आणि इतर शुल्कापोटी १५०० रुपये असे एकूण प्रत्येकी २३०० रुपये वसूल केले होते, ते परत केल्याचे शाळेने जाहीर केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र