शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये जनतेला दिसतो रावण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:39 AM

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये नागरिकांना रावण दिसतो. या खड्ड्यांच्या रुपातील रावणाचा महापालिकेने आगामी वर्षभरात नायनाट केला पाहिजे, असा भेदक बाण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी महापालिकेवर सोडला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये नागरिकांना रावण दिसतो. या खड्ड्यांच्या रुपातील रावणाचा महापालिकेने आगामी वर्षभरात नायनाट केला पाहिजे, असा भेदक बाण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी महापालिकेवर सोडला.सिडकोतील एन-७ येथील रामलीला मैदानावर उत्तर भारत संघातर्फे विजयादशमीनिमित्त आयोजित केलेल्या रावणदहन कार्यक्रमाच्या वेळी बागडे यांच्या बाणामुळे आमदारांसह आजी माजी नगरसेवकही घायाळ झाले.रामलीला मैदानावर सायंकाळी ‘प्रभू श्रीरामचंद्र की जय’ अशा जयघोषात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रावणदहन करण्यात आले. याप्रसंगी आ. अतुल सावे, उद्योगपती आर. एल. गुप्ता, शेखर देसरडा, नगरसेविका सुरेखा खरात, शिरीष बोराळकर, नगरसेवक राजू शिंदे, अनिल मकरिये, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती, माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, विश्वनाथ स्वामी, संस्थापक सी. के. दीक्षित, उत्तर भारत संघाचे अध्यक्ष एल. एन. शर्मा, उपाध्यक्ष बच्चूसिंग लोधी, कोषाध्यक्ष ओमीराम पटेल, सचिव विनोदकुमार दीक्षित, उदयभान डागर आदी उपस्थित होते.बागडे यांच्यासह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. रामलीला मैदानावर उभारण्यात आलेल्या पुतळ्याभोवती पारंपरिक पद्धतीने रिंगण करून वाद्यांचा गजर सुरू होता. रावणदहनापूर्वी फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले. रावणदहन होताच फटाक्यांचा दणदणाट झाला. यावेळी विजयादशमीच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी बंटी दीक्षित, मुकेश शर्मा, सी. पी. पटेल, मुकेश लोधी, सुर्जनसिंह, वैजनाथ सिंह, शिवसिंह, जगदीश प्रसाद राजपूत यांनी परिश्रम घेतले.