लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या अधिमंडळाची २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या आज झालेल्या वार्षिक सभेत संघाचे अध्यक्ष व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व त्यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले माजी आ. डॉ. कल्याण काळे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला बघावयास मिळाला. जालना रोडवरील पाटीदार भवनात झालेल्या या सभेस मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी आपापले प्रश्न घेऊन आले होते. त्यांच्यासमोरच हा कलगीतुरा मनोरंजनाचाच विषय ठरला.सभेच्या शेवटी दोन भाषणे झाली. डॉ. कल्याण काळे बोलले आणि त्यानंतर बागडे बोलले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. काळे यांचा पराभव झाला होता. सभेत या दोघांच्याही बोलण्यात मागच्या व आगामी निवडणुकीच्या छटा होत्या. सभेनंतर पंगतीत दोघेही जेवायला एकमेकांच्या बाजूला हास्य विनोद करीत बसलेले होते.डॉ. काळे यांनी उपस्थितांना प्रश्न विचारला की, तुमची गाय किती पाणी पिते? एक दोन लिटर?उपस्थितांनी उत्तर दिले, एक दोन लिटर.काळे म्हणाले, माझी गाय दोनशे लिटर पाणी पिते आणि हौदावर पाणी प्यायला ती अनेकदा जाते.डॉ. काळे यांच्या या मुद्यांचा परामर्श घेतला. ते म्हणाले की, गाय दोनशे लिटर पाणी पिते, हे जरा आश्चर्याचेच वाटते. त्यावर हंशा पिकला.२०१४ साली माझी आई वारली. ती शेती करायची. आई वारल्यामुळे आणि निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे माझ्यावर शेती करण्याची जबाबदारी आली. शेतीत मी मिरच्या लावल्या. त्यावेळी भाव होता शंभर रु. किलो. मला वाटले, चांगला फायदा होईल; पण मिरच्या काढल्या तेव्हा भाव एवढा खाली आला होता की, तो भाव पाच रु. किलो झाला होता.या मुद्याचाही बागडे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, भाव कमी जास्त होऊ शकतात. पण एवढेही नाही, की शंभर रुपयाचे एकदम पाच रु. किलो.बागडेंच्या या गुगलीवर पुन्हा हंशा पिकला.नाना, तुम्ही आॅस्ट्रेलियाला गेला; पण माझा डेअरी फार्म बघायला आला नाहीत. आता या. तुम्ही म्हणाल, हा काँग्रेसचा असल्यामुळे खोटे निमंत्रण देतोय.त्यावर नाना म्हणाले, विकासात मी कधीही राजकारण आणत नाही.
दूध संघाच्या सभेत बागडे- काळे यांचा कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 1:14 AM