लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विनासंमती विवाहितेचा गर्भपात केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केलेल्या बोगस डॉॅक्टरसह विवाहितेचा पती आणि नंदईला न्यायालयाने सोमवारी २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.ललिता मून ऊर्फ खाडे, सुनील वाघ आणि बापू डिघोळे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी रविवारी या आरोपींना अटक केली आणि त्यांना आज सोमवारी न्यायालयात हजर केले. आरोपी खाडे हिने आपत भालगाव येथे अवैध गर्भपात केंद्र सुरू केले होते. तेथे मोठा औषधीसाठा पोलिसांच्या हाती लागला. हा साठा कोठून आणला, याबाबतचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करून आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिली.
बोगस डॉक्टरसह तिघांना २९ पर्यंत कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 1:18 AM