छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळानेही चालक म्हणून महिलांना संधी देण्याचा मोठा गाजावाजा केला. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जून महिन्यात पाच महिला चालक तथा वाहक म्हणून रूजू झाल्या होत्या. त्या अनेक महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर रुजू झाल्या होत्या. जिल्ह्यात वाहकांची संख्या कमी असल्याने महिलांना बसमध्ये प्रवाशांना तिकीट देण्याचेच काम दिले जात आहे.
माजी राष्ट्रपतींच्या हस्ते दिली होती नियुक्तिपत्रेभारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते २३ ऑगस्ट २०१९ रोजी महिलांना चालक तथा वाहक म्हणून नियुक्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर महिला चालकांना बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, चालकांना नियमितपणे बस चालविण्याची जबाबदारीच दिली जात असल्याची परिस्थिती आहे.
एसटी अधिकारी म्हणाले...एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे संबंधित महिलांना सध्या वाहक म्हणून कर्तव्य देण्यात येत आहे.
वाहकांची स्थिती...- कार्यरत वाहक : ७६२- आवश्यक वाहक : ९६६- कमी असलेले वाहक : २०४
चालकांची स्थिती...नियमित चालक - ८४८चालक तथा वाहक - २९७
कुठे किती महिला चालक?- मध्यवर्ती बसस्थानक - ३- गंगापूर - १- वैजापूर - १