वाळूज महानगर : बजाजनगरातील जैन स्थानकात आयोजित पर्यूषण पर्वाची रविवारी उत्साहात सांगता करण्यात आली. या पर्यूषण पर्वात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रवचन व एकमेकांची क्षमा मागत या पर्वाचा समारोप करण्यात आला.
बजाजनगरातील जैन स्थानकात श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, पंढरपूर- बजाजनगरच्यावतीने पर्यूषण पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पर्यूषण पर्वात डॉ. अशोककुमार पगारिया, ॲड. पी. एम. जैन-संचेती, शांतीलाल फुलपगर यांनी प्रवचनातून समाज प्रबोधन केले. रविवारी समारोप प्रसंगी सकाळी साडेआठ वाजता ॲड. पी. एम. जैन यांनी वाचन केले. कार्यक्रमात डॉ. अशोककुमार पगारिया यांनी ‘वर्तमान मे भगवान महावीर’ या विषयावर प्रवचन दिले. माता-पित्याची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा असून, प्रत्येकाने जीवनात चांगले कर्म करण्याचा सल्ला दिला. जप, तप व साधना यांच्या माध्यमातून आत्म कल्याणाचा मार्ग सुकर होत असल्याचे त्यांनी विषद केले. कोरोनाचे संकटामुळे प्रत्येक जणांना कुटुंबासोबत एकत्र राहण्याचे डॉ. पगारिया यांनी प्रवचनातून पटवून दिले. कार्यक्रमात शांतीलाल फुलपगर यांनी प्रतिकरण व तीर्थंकारांची माहिती दिली. यावेळी एकमेकांची क्षमा मागत या पर्वाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ पंढरपूर- बजाजनगरचे अध्यक्ष संतोष चोरडिया, उपाध्यक्ष किशोर राका, महामंत्री चंद्रकांत चोरडिया, डॉ. प्रविण तातेड, अशोक तातेड, संतोष गुंदेचा, किरण नहार, महावीर शिंगी, चेतन छाजेड, मनोज कटारिया, जितेंद्र बेदमुथा, रविंद्र बेदमुथा, सुमित कुचेरिया, अजय दुग्गड, मनोज मंडलेचा, गिरीश दुग्गड, अशोक बोरा, भारती गुगळे, वर्षा कर्नावट, जयश्री नहार, सुलोचना छल्लानी, आदींसह समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ- बजाजनगरातील पर्यूषण पर्वाच्या समारोप प्रसंगी डॉ. अशोक पगारिया, ॲड. पी. एम. जैन संचेती, शांतीलाल फुलपगर व समाज बांधव दिसत आहेत.
फोटो क्रमांक- समारोप १/२/३
----------------------------