- सुनील घोडके
खुलताबाद : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जि.प. व खाजगी शाळामध्ये शिल्लक असलेला तांदूळ व डाळी ( कडधान्य) विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश शालेय व क्रीडा विभागाने निर्गमित केले आहेत.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोरोनाचा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्यातील शाळांना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वयेे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे व नुकतेच केंद्र सरकारनेही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व बंद असल्याने शालेय मुले पोषण आहारापासून वचिंत राहत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना पोषण होण्याच्या दृष्टीने आहार देणे आवश्यक आहे.जि.प.व खाजगी शाळास्तरावर शिल्लक असलला तांदूळ व डाळी ( कडधान्ये) विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश प्रशासनाने निर्गमित केले आहेत.
पोषण आहार वाटप करत असतांनी शाळेचे मुख्याध्यापक / या योजनेचे काम बघणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी पोषण आहार समप्रमाणात वाटप करायचेे नियोजन करून विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटपाबाबत शाळास्तरावरून प्रसिध्दी करण्यात यावी. पोषण आहार नेण्याबाबत विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येवून शाळास्तरावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी .शाळेतील विद्यार्थी त्यांचे पालक यांना टप्या टप्याने शाळेत बोलवावे व वाटप करावे .उपस्थित असलेले पालक व विद्यार्थी यांना एकमेकापासुन रांगेत एक मीटर अंतरावर उभे करण्यात यावे. विद्यार्थी जर आजारी असेल तर घरपोच वाटप करण्यात यावे. कोरोनाबाबत दिलेल्या आदेश व सुचनाचे कुठलेही उल्लघंन होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच वाटपाची पुर्वसुचनाा पोलीस व महसुल प्रशासनास द्यावी असे आदेश निर्गमित झाले आहे.
शालेय पोषण आहार वाटपात अनेक अडचणी..कोरोनामुळे मुलांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे शिल्लक धान्य साठा मुलांना वाटप करण्याबाबत शासनाचे आदेश आहे.परंतु तांदूळ वगळता डाळी , मीठ,मसाला, जिरे ,हळद, मोहरी यांचे वाटप कसे करावे ? कारण हे तर प्रत्येक विद्यार्थ्यांना 20 ते100 ग्रॅम वाटप करावे लागेल.
- कैलास गायकवाड, जिल्हा सरचिटणीस प्राथमिक शिक्षक संघ औरंगाबाद.