छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. मराठवाडा सास्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत असलेल्या या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अदानी प्रकरणावरुन भाजपवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातल्या संबंधांवर प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं की, अदाणींच्या खात्यावर 20 हजार कोटी आले कुठून? यावर उत्तर द्यायला अद्याप कुणी तयार नाही. या प्रश्नांचे उत्तर न देता राहुल गांधींची खासदारकी काढून घेतली. देसात काय सुरू आहे? हुल गांधींनी विचारलं की, अदानी आणि पंतप्रधानांचा संबंध काय? सरकारने उत्तर न देता त्यांचे भाषण कामकाजातून बाहेर काढले. त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देण्याची परवानगी मागूनही त्यांना बोलू दिलं नाही,' अशी टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, भाजपला वाटायचं की, कसब्यात कोणीही उभा केला तरी निवडून येईल. पण जनतेने तिथे भाजपाला नाकारले. चिंचवडध्ये फूट पडली नसती, तर तिथेही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला असता. कर्नाटक निवडणुकीच्या सर्वेतही काँग्रेस विजयी होणार असल्याचे दिसत आहे. याचा अर्थ वातावरण बदलतंय. देशात जो कुणी विरोधात बोलेल, त्याच्याघरी ईडी जाऊन पोहोचते, पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो. राहुल गांधींनी याविरोधात भारत जोडो पदयात्रा काढली. ती एक यशस्वी पदयात्रा झाली.राज्यातही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र राहिलो, तर 180 पेक्षा जास्त जागा आपण जिंकू, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवा.