औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या ११ व्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बळीमार पाटील विद्यालयाने केंद्रीय विद्यालय, महाराष्ट्र पब्लिक स्कूलने रिव्हरडेलचा आणि एसएफएसने केम्ब्रिजचा पराभव केला. आज झालेल्या सामन्यात इरफान पठाण, कौशल कांबळे व अजित मालवीय हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.पहिल्या सामन्यात बळीराम पाटील विद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत २ बाद १८० धावा केल्या. त्यांच्याकडून शाकीर पठाण याने ४५ चेंडूंत ९ चौकारांसह ६३ आणि इरफान पठाण याने २४ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह ६५ धावा ठोकल्या. केंद्रीय विद्यालयाकडून पीयूष कोठावडे व प्रतीक पवार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात केंद्रीय विद्यालय ९ बाद ६२ धावा करू शकला. त्यांच्याकडून ओंकार जगदाळेने २० व पीयूष कोठावडे याने नाबाद १९ धावा केल्या. बळीराम पाटील विद्यालयाकडून ऋतुराज विधाते, यश ओहोळ व मुबीन पठाण यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. दुसºया सामन्यात रिव्हरडेलने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत सर्वबाद ९० धावा केल्या. त्यांच्याकडून अभिजित डिपके याने १६ व सिद्धार्थ कोळीने १२ धावा केल्या. महाराष्ट्र पब्लिक स्कूलकडून विशाल कोटकर याने ३, व तनुज सोळुंके व आदित्य पाटील यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात महाराष्ट्र पब्लिक स्कूलने विजयी लक्ष्य ८.४ षटकांत २ बाद ९१ धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून कौशल कांबळे याने ४ चौकारांसह नाबाद ३१, अभिजितने २० व प्रतीकने नाबाद १८ धावा केल्या. रिव्हरडेलकडून हर्ष पवार व सिद्धेश कोळी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.तिसºया सामन्यात केम्ब्रिजने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ७ बाद ७३ धावा केल्या. त्यांच्याकडून साहील धूतने १७ धावा केल्या. एसएफएसकडून अजित मालवीय याने १७ धावांत ३ गडी बाद केले. मनीष पांडेने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात एसएफएसने विजयी लक्ष्य ८.४ षटकांत ५ गडी गमावत पूर्ण केले. त्यांच्याकडून प्रतीक रणदिवे याने १७ धावा केल्या. एसएफएसला २५ धावा या अवांतर धावांच्या रूपाने मिळाल्या. केम्ब्रिजकडून सिमर राजपालने २ गडी बाद केले.
बळीराम पाटील, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, एसएफएस विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 11:12 PM
जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या ११ व्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बळीमार पाटील विद्यालयाने केंद्रीय विद्यालय, महाराष्ट्र पब्लिक स्कूलने रिव्हरडेलचा आणि एसएफएसने केम्ब्रिजचा पराभव केला. आज झालेल्या सामन्यात इरफान पठाण, कौशल कांबळे व अजित मालवीय हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
ठळक मुद्देआंतरशालेय क्रिकेट स्पर्धा : इरफान, कौशल, अजित सामनावीर