शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

विद्यार्थ्यांवर दाखल गुन्ह्यांच्या विरोधामुळे अधिसभा सदस्यांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटिसा

By राम शिनगारे | Published: February 21, 2024 5:07 PM

सात दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याच्या सूचना

 

छत्रपती संभाजीनगर : 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी विद्यापीठात येऊन धुडगूस घातल्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर प्रशासनाने गुन्हे नोंदवले होते. विद्यार्थी नेत्यांवर नोंदवलेला गुन्हा घृणास्पद असून, तत्काळ परत घेण्याची मागणी करणाऱ्या तीन अधिसभा सदस्यांना प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

विद्यापीठ कॅम्पसमध्ये बाहेरून आलेल्या टोळक्याने दहशत निर्माण केली होती. त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करून धुडगूस घालणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली. यानंतर विद्यापीठाने धुडगूस घालणाऱ्या अज्ञात टोळक्यासोबतच कुलगुरू दालनासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांवरही गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, डॉ. विक्रम खिल्लारे आणि डॉ. उमाकांत राठोड यांनी १५ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देत विद्यार्थी नेत्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.

या सदस्यांना कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात अधिसभा सदस्य म्हणून विद्यापीठ प्रशासनासोबत आपली भूमिका सुसंगत असणे अपेक्षित आहे. आपण अधिसभेचे सदस्य असण्याखेरीज संलग्नित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात. त्या अर्थी कुलगुरू महोदयांना उद्देशून केलेला पत्रव्यवहार हा राजशिष्टाचाराच्या संकेतांचे पालन करणारा असणे अपेक्षित आहे. निवेदनातील आपण नमूद केलेल्या बाबी, ती मांडण्याची पद्धत आणि त्यातील भाषा हे अधिसभेचे सदस्य म्हणून अनपेक्षित आहे. हे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदींप्रमाणे असमर्थनीय असून गैरवर्तन प्रकारात मोडणारे आहे, असे यात म्हटले आहे. याविषयी प्रभारी कुलसचिव डॉ. अमृतकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्नअधिसभा सदस्यांना विद्यापीठ कायद्यातील सेक्शन २८ (१) प्रमाणे शैक्षणिक, अशैक्षणिक घडामोडींबद्दल विचारणा करण्याचे अधिकार आहेत. नोटीसमध्ये उल्लेख केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम अधिसभा सदस्यांना लागू होतो का? हे सदस्य विद्यापीठाचे कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत. निवेदन देणारे तिन्ही सदस्य हे संघटनांचे पदाधिकारी आहे. आगामी काळात कोणताही प्रश्न विचारू नये, यासाठी अशा पद्धतीने मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे. यामागचा मास्टरमाइंड कोण? त्याचा शोध घेतला जाईल.- डॉ. शंकर अंभोरे, अधिसभा सदस्य

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र