ठळक मुद्देदोन दिवसांत मागण्यांवर निर्णय न घेतल्यास सर्व उपचारही बंद
औरंगाबाद : विद्यावेतन आणि विविध मागण्यांसाठी घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी नॉन कोविड उपचार बंद करण्याचा निर्णय शनिवारी घेतला. सध्या कोविड रुग्णांवर उपचार सुरू ठेवले जाणार असून, दोन दिवसांत मागण्यांवर निर्णय न घेतल्यास हे उपचारही बंद करण्याचा इशारा मार्ड संघटने दिला आहे.
घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांचा संप; जाणून घ्या काय आहेत त्यांच्या मागण्या
Posted by Lokmat Aurangabad on Friday, 21 August 2020
घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन मिळालेले नाही. विद्यावेतन आणि इतर मागणी पूर्ण होत नसल्याने निवासी डॉक्टरांनी आज नॉन कोविड सेवा बंद केली. डॉक्टर एकत्रित आले असून, अन्य उपचार विस्कळीत झाले आहेत.