छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात चातुर्मास काळात लग्न होत नाहीत; पण यंदा पंचागकर्त्यांनी पावसाळ्यात लग्नतिथी दिल्या आहेत. यामुळे भर पावसात निघालेल्या वराती तुम्ही यंदा पाहू शकाल. यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या वधू-वरांना आता दिवाळीनंतरच्या मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मग पावसाळ्यातच ‘लग्नाचा बार’ उडवून द्या.
जून व जुलैमधील मुख्य मुहूर्तपंचागकर्त्यांनी जून व जुलैमध्ये मुख्य मुहूर्त दिले आहेत. दोन महिन्यांत मिळून ८ लग्नतिथी आहेत. यात जूनमध्ये २९ व ३० तारीख व जुलैमध्ये ९,११,१२,१३,१४ व १५ तारीख देण्यात आली आहे. यानंतर चातुर्मास असल्याने मुख्य लग्नतिथी नाहीत. थेट १७ नोव्हेंबरपासून लग्नसराईच्या धामधूमीला सुरुवात होईल.
गौणकाल/आपत्कालीन लग्नतिथीमहिना लग्नतिथीजून : १२, १६,१८,२४,२५, २६, २८.जुलै : १९,२१, २२, २३,२६,२७,२८,३१.ऑगस्ट: १०, १३, १४, १६,१८, २३, २७,२८.सप्टेंबर : ५,६,१५,१६.ऑक्टोबर: ७,९,११,१२,१३,१७,१८,२६.नोव्हेंबर : ७,८,९,१०,१३.
६ महिन्यांत ४० लग्नतिथीजून ते सप्टेंबर या चार महिन्यांत गौणकालातील २७ लग्नतिथी दिल्या आहेत, तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात १३ लग्नतिथी म्हणजे ६ महिन्यांत ४० लग्नतिथी देण्यात आल्या आहेत.
गौणकाळात कोणी लग्न करावेशक्यतो आपल्याकडे मुख्य काळात लग्न करणे सर्वोत्तम मानले जाते. पूर्वी पावसाळा, चातुर्मासात कोणी लग्न करीत नव्हते, कारण त्याकाळात मंगल कार्यालय नव्हते. घरासमोर मंडप टाकून लग्न करीत होते; पण आता मंगलकार्यालयातच लग्न लावले जातात. पाऊस आला तरी कोणतेही विघ्न येत नाहीत. मात्र, गौणकाळात कोणी लग्न करावे तर कोणाला विदेशात जायचे आहे, घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती आजारी आहे, त्यांच्या समोर लग्न लावायचे आहे. मुला-मुलींचे वाढते वय, अन्य काही अडचणी आहेत. अशा वेळी गौणकाळ /आपत्कालीन लग्नतिथी देण्यात आल्या आहेत.- वेदमूर्ती, सुरेश केदारे गुरुजी
चातुर्मासातही मंगल कार्यालय बुकिंगचातुर्मास काळात पूर्वी लग्नासाठी मंगल कार्यालय बुकिंग होत नव्हते; पण आता पंचांगामध्ये लग्नतिथी झाल्याने जुलै, ऑगस्ट महिन्यातील काही तारखा बुकिंग झाल्या आहेत, तसेच बुकिंगविषयी चौकशी केली जात आहे. मंगल कार्यालय व लग्न उद्योगासाठी आनंदाची बाब होय.- गणेश साखरे, मालक, मंगल कार्यालय