शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

अनुदानासाठी फेकल्या बांगड्या!

By admin | Published: December 14, 2015 11:52 PM

बीड : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. मागील सहा महिन्यांपासून निराधारांचे अनुदान मंजुरीचे प्रस्ताव बैठक न झाल्याने पडून आहेत

बीड : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. मागील सहा महिन्यांपासून निराधारांचे अनुदान मंजुरीचे प्रस्ताव बैठक न झाल्याने पडून आहेत. या विरोधात संजय गांधी अनुदान समितीचे माजी अध्यक्ष दिलीप भोसले यांच्या नेत्तृत्वाखाली सोमवारी निराधार महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बांगड्या फेकून प्रशासनावरील रोष व्यक्त केला.मागील वर्षभरात तहसील कार्यालयात एकही बैठक न झाल्याने निराधारांच्या अनुदानाचे प्रस्ताव धुळखात पडून आहेत. एकीकडे जिल्हयात तीव्र दुष्काळ आहे तर दुसरीकडे निराधारांना अनुदान मिळत नसल्याने बांगडी फेको मोर्चा सोमवारी काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निराधारांचे अनुदान महागाई नुसार ६०० वरून १५०० रूपये करावे, राष्ट्रीय अर्थ कुटूंब सहाय्यासाठी दारिद्र्य रेषेची अट रद्द करून २० हजारावरून अर्थ कुटुंब सहाय्य १ लाख रूपये द्यावे. या मागणीसह विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी निराधार महिलांनी केलेल्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणूण गेला होता. मोर्चा दरम्यान नगर रोड वर दोन तास वाहतून ठप्प झाली होती. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप भोसले, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक हिंगे, यांच्यासह हजारो महिलांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)