लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : भारतीय स्टेट बँकेमध्ये हैद्राबाद बँकेचे विलिनीकरण झाल्यापासून बँकेवर ग्राहकांची गर्दी वाढली, असून अतिरिक्त कर्मचारी नेमून जास्तीचे काऊंटर सुरू करण्याची मागणी ग्राहकामधून होत आहे.भारतीय स्टेट बँक ही शहरात कार्यरत असून पाथरी रोड वरील स्टेट बँकेची शाखा बंद करून प्रशासनाने शिवाजी चौकातील हैदराबाद बँकेलाच भारतीय स्टेट बँकेत रूपांतरित केले आहे. पुर्वी शहरात हैदराबाद ही एकमेव बँक कार्यरत होती़ परंतु, कालांतराने एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक आल्या़ त्यामुळे हैदराबाद बँकेवरचा ताण कमी झाला़ मात्र भारतीय स्टेट बँक व हैदराबाद बँकेचे विलीनीकरण झाल्याने सध्या या बँकेत ग्राहकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. सेवानिवृत्त, कर्मचारी व्यापारी, शेतकºयांचे व्यवहार या बँकेत असल्याने मोठी गर्दी होते. पैशाच्या व्यवहारासाठी पुर्वीच्या एवढेच दोन काँऊटर असल्याने ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अतिरिक्त दोन काँऊटर सुरू केल्यास ग्राहकांची गर्दी कमी होईल. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे़
विलिनीकरणानंतर बँक सेवा झाली विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:22 AM