शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

वसुलीच्या चिंतेने बँकांचा पीककर्ज वाटपात आखडता हात, केवळ ६५ टक्के वाटप

By बापू सोळुंके | Published: September 01, 2023 8:48 PM

दुष्काळी परिस्थितीचा फटका ; मराठवाड्यात केवळ ६५ टक्केच वाटप 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविल्याचे दिसताच बँकांनीही शेतकऱ्यांना कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक आणि ग्रामीण बँकांनी फक्त ६५ टक्के कर्जाचे वाटप केले आहे.

कर्ज कशासाठी लागते ?बी-बियाणे, कीटकनाशके, उपकरणे खरेदी, पिकांचे नियोजन, विक्री

सन २०२३-२४ साठी बँकांना उद्दिष्ट किती ?११ हजार ७७८ कोटी ७१ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत बँकांनी ७ हजार ६६५ कोटी ९५ लाख ४८ हजार रुपये कर्ज वाटप केल्याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. वाटप करण्यात आलेल्या कर्जाची टक्केवारी केवळ ६५.०८ टक्के आहे. ३ लाख ५१ हजार ७०३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी हे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज मिळते परतपीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार ४ टक्के व्याजाची रक्कम परत करते. तर राज्य सरकारच्या वतीने पंजाबराव देशमुख शेतकरी पीककर्ज व्याज सवलत योजनेंतर्गत ३ टक्के व्याज असे एकूण ७ टक्के व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना देते. यामुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी पीककर्ज मिळते.

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ १०.४१ टक्के पीककर्जजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज वाटप करण्याबाबत नकारघंटाच असते. जालना जिल्ह्याला शासनाने पीककर्ज वाटपाचे दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ १०.४१ टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

जिल्हा---पीक कर्जाची एकूण रक्कम--- टक्केवारीऔरंगाबाद--१०६४ कोटी ४ लाख ९६ हजार- ७३.९५ टक्केजालना- १२९ कोटी ९६ लाख २६ हजार- १०.४१ टक्केपरभणी-६८४ कोटी ५९ लाख १५ हजार- ४९.३० टक्के--लातूर-- १ हजार ८०६ कोटी ९३ हजार ---- ९३.०५ टक्केधाराशिव-९२३ कोटी ९७ लाख ६४ हजार- ६४.१९ टक्केबीड-१ हजार २३८ कोटी ८३ लाख २२ हजार--७५.५४ टक्केनांदेड-१ हजार ३३४ कोटी ६५ लाख ९६ हजार-- ७३.६२ टक्के--लातूर-- ५ हजार ३०३ कोटी ४७ लाख ७५ हजार- ७७.६२ टक्के

टॅग्स :Crop Loanपीक कर्जMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी