औरंगाबाद : रेल्वेची वाट बघत-बघत आता पाय दुखायला लागले... थोडावेळ तिकडे बसतो... थांब, रेल्वे येईलच, बस त्या सुटकेसवर... बॅगवर... असेच काहीसे संवाद रेल्वेस्थानकावर येणाऱ्या अनेक प्रवाशांमध्ये घडत आहेत. मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जुन्या इमारतीच्या जागेचा विकास करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत; परंतु आजघडीला जुन्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील भागात पुरेसे बाकडे नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसतआहे.बाकड्यांअभावी या ठिकाणी प्रवाशांना रेल्वेची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे. अशा परिस्थितीमुळे ज्येष्ठ प्रवाशांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकाचा मॉडेल रेल्वेस्थानकात समावेश झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात नवीन इमारतीचे काम झाले. यानंतर आता जुन्या इमारतीच्या जागेत दुसऱ्या टप्प्यातील काम इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (आयटीडीसी) सहकार्याने केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी १४.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पहिल्या टप्प्यातील नव्या इमारतीचे २०१२ मध्ये लोकार्पण करण्यात आले; परंतु दुसऱ्या टप्प्यातील काम प्रत्यक्षात कधी सुरूआणि पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुटकेस अन बॅग्जचा बसण्यासाठी घेतला आधार
By admin | Published: November 16, 2014 12:02 AM