मारूती कदम, उमरगालोकसभा निवडणुकीनंतर राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या उमरगा विधानसभा मतदारसंघातील सर्वच पक्षांची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या मतदारसंघातून महायुतीला तब्बल ३५ हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची मानण्यात येत आहे. त्यानुसार विधानसभेचा गड जिंकण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. औश्याचे विद्यमान आ. बसवराज पाटील यांच्यामुळे या तालुक्यात गेल्या २० वर्षाच्या कालावधीत काँग्रेस पक्षाला आपले वर्चस्व प्रस्थापित करता आले. पहिल्याच प्रयत्नात पाटील यांना आमदारकी आणि राज्यमंत्रीपदही मिळाले. त्यांच्या रुपाने उमरगा मतदारसंघात काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर हा मतदारसंघ आरक्षित झाल्याने आमदार पाटील यांनी औसा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. औसा आणि उमरगा या दोन्ही मतदारसंघात त्यांनी काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. आमदार पाटील आगामी विधानसभेसाठी ज्या उमेदवाराची शिफारस करतील, त्या उमेदवारालाच काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार आहे. सन २००९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नवखे उमेदवार ज्ञानराज चौगुले व काँग्रेसचे बी. पी. गायकवाड यांच्यात लढत होऊन त्यामध्ये चौगुले यांनी बाजी मारली होती. काँग्रेसचे कार्यकर्ते प्रा. डी. के. कांबळे यांनी या निवडणुकीत बंडखोरी केली होती. मागील पाच वर्षाच्या कालावधीत या विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती, जि. प. च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व अबाधित ठेवण्यात या पक्षाला यश आले असले तरी उमरगा पालिकेची निवडणूक जिंकून महायुतीने शहरात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या या विधानसभा मतदारसंघात आमदार बसवराज पाटील व खा. प्रा. रविंद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले, आ. सतीश चव्हाण, प्रा. सुरेश बिराजदार, बापूराव पाटील, संताजी चालुक्य, जि. प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, जिल्ह्याच्या राजकारणातील सर्व महत्वाची पदे या विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे असल्याने राजकीयदृष्ट्या हा विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात प्रतिष्ठेचा मानला जात आहे. महायुतीतून आमदार ज्ञानराज चौगुले यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी गेल्या अनेक दिवसापासून चढाओढ सुरू आहे. प्रा. डी. के. कांबळे हे काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झाल्याने उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेले डॉ. बी. पी. गायकवाड हे पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आमदार बसवराज पाटील यांच्या निकटचे कार्यकर्ते दिलीप भालेराव यांचेही नाव पुढे येऊ शकते. दुसरीकडे महायुतीसाठी नवनिर्वाचित खासदार प्रा. रवींद्र गायकवाड सांगतील त्याच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडणार असल्याने बसवराज पाटील व खा. रविंद्र गायकवाड यांच्याकडेच या दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या नजरा खिळल्या आहेत. गाव पुढारी सज्जमागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी अत्यल्प असल्याने लोकसभा निवडणूक कालावधी दरम्यान या मतदारसंघातील पं. स. सदस्य, जि. प. सदस्य, ग्रा. पं. सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्यापर्यंत पक्षाची मदत पोहोचली नाही. विधानसभा निवडणूक मात्र मर्यादित असल्याने या निवडणुकीत उमेदवारांना गाव पुढाऱ्यांना अधिक महत्व द्यावे लागणार आहे. त्यामुळेच गाव पुढारीही निवडणुकीचा रागरंग लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत. २००९ च्या निवडणुकीत पडलेली मते्नआ. ज्ञानराज चौगुले : ७०,८०६डॉ. बी. पी. गायकवाड : ६०,४७४म्हन्तय्या स्वामी :१३,९५४राम गायकवाड : २०६२दत्तात्रय कांबळे : १८२३
महायुतीच्या प्रतिष्ठेची तर आघाडीच्या अस्तित्वाची लढाई
By admin | Published: June 12, 2014 11:45 PM