तंत्रज्ञानाच्या विश्वस्त क्षेत्रात काही विस्तार केंद्र सुरू करण्याचा निर्णय बाटूने घेतला आहे. औरंगाबादेत ऑटोमोटिव्ह आणि रोबोटिक रिसर्च आणि फार्मास्युटिकल टेस्टिंग सुविधेसाठी, तसेच पुणे येथे सायबर सुरक्षा आणि डेटा विज्ञान आणि रत्नागिरीत अन्न अभियांत्रिकी आणि मत्स्यपालन, अकोला येथे ग्रामीण व कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप उपक्रम, सोलापुरात ग्रामीण ऊर्जा आणि ग्रामीण पाण्याचे संशोधन, अशी केंद्रे सुरू केली जाणार असल्याचे डॉ. अभिजित वाडेकर यांनी सांगितले.
मजबूत परीक्षा प्रणालीत मार्गदर्शक तत्त्वे दिल्यानंतर उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी टर्मिनल परीक्षा त्वरित सुरू करणारे डीबीएटीयू हे पहिले विद्यापीठ होते. सेेमीस्टर परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त परीक्षा सेमीस्टर निकाल लगेच लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही.
पूर्णवेळ संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी.ची शिष्यवृत्ती सुरू केली आहे. कोविड काळात विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले नाही. आत्मनिर्भर भारत सेल, सर्व विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण, एक इंटर्नशिप प्रत्येक सेमीस्टरमध्ये आहे. २० टक्के ऑनलाइन अभ्यासक्रम, प्रत्येक सत्रात चर्चासत्र इत्यादीचा समावेश असल्याचे पत्रकार परिषदेत डॉ. एन.जी. पाटील यांनी सांगितले.