औरंगाबाद : औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १३७ नव्या रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील रुग्णांची सर्वाधिक आहे, तर एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शहरात मंगळवारी ९६ तर बुधवारी ११९ असे दोन दिवसात एकूण २१५ रुग्ण वाढले आहेत. तब्बल साडेतीन महिन्यांनंतर जिल्ह्यात रुग्णांचा तिहेरी आकडा झाल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात सध्या ४९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ४७ हजार ९७९ झाली आहे. यात आतापर्यंत ४६ हजार २३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १३७ रुग्णांत मनपा हद्दीतील ११९, ग्रामीण भागातील १८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४० आणि ग्रामीण भागातील ५, अशा एकूण ४५ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. संजयनगरातील ७० वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला
मनपा हद्दीतील रूग्ण -११९मोरेश्वर हा.सो. १, चेतक घोडा परिसर १, आकाशवाणी परिसर, मित्र नगर १, शिवाजीनगर ३, तिरूपती एक्जीक्यूट १, एन नऊ सिडको १, चौधरी नगर १, एन नऊ हडको १, एन सहा अविष्कार कॉलनी ३, एन वन सिडको ३, दशमेश नगर १, संग्रामनगर १, एन सात सिडको २, नंदनवन कॉलनी २, सातारा परिसर ३, सिंधी कॉलनी ३, मुकुंदवाडी २, हायकोर्ट परिसर १, एन चार सिडको ४, चिकलठाणा १, बन्सीलालनगर २, अजबनगर १, राजे संभाजी कॉलनी २, एन पाच सिडको १, इटखेडा १, सूतगिरणी परिसर १, घाटी परिसर २, बीड बायपास ४, सूदर्शननगर, हडको १ द्वारकानगर १, पटेलनगर १, एन बारा हडको १, क्रांती चौक १, व्यंकटेश नगर १, स्काय सिटी बीड बायपास १, उस्मानपुरा ३, ज्योतीनगर १, साई श्रद्धा नक्षत्रवाडी १, सुराणानगर १, मिल कॉर्नर, नवीन पोलीस कॉलनी परिसर १, छत्रपतीनगर, बीड बायपास २, अन्य ५३
ग्रामीण भागातील रूग्ण- १८पैठण १, सराफा बाजार सिल्लोड १, वाळूज रेल्वे स्टेशन कॅम्प १, साईनगर सो., हिरापूर २, सलामपूर, वडगाव १, बजाजनगर २, नागद, कन्नड १, वीरगाव, वैजापूर १, सावंगी, लासूर स्टेशन १, वैजापूर १, फुलंब्री १, अन्य ५