शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
3
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
4
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
5
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
6
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
7
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
8
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
9
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
10
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
11
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
12
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
13
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
14
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
15
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
16
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
17
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
18
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
19
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
20
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल

सावधान ! अद्याप मंजुरीच नाही अन कोरोनाचे लसीकरण होत असल्याची शहरात अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 6:09 PM

corona virus in Aurangabad शासनाकडून अधिकृतपणे लस उपलब्ध करून दिलेली नसताना नागरिकांनी घाई करू नये.

ठळक मुद्देकोरोना लसिकारणाला अद्याप परवानगी नाहीमनपाचा सावधानतेचा इशारा

औरंगाबाद : शहरात काही ठिकाणी लपूनछपून कोरोना संसर्ग विरोधक लसीकरण केले जात असल्याची अफवा पसरली आहे. अंदाजे २३०० रुपयांना ही लस दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या चर्चेत कोणताही अर्थ नसल्याचे स्पष्टीकरण  महापालिका आरोग्य विभागाने दिले आहे.. अन्न व औषधी प्रशासनाने अद्याप लसीकरणासाठी कुठेही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला मनपाने दिला आहे.  

मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले, लसीकरण होत असल्याबाबत अफवा कानावर येत आहेत. मात्र, शासनाकडून अधिकृतपणे लस उपलब्ध करून दिलेली नसताना नागरिकांनी घाई करू नये. अद्याप कोणत्याही लसीला अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. शासनाकडून मोफत लस दिली जाणार असून नागरिकांनी संयम पाळणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गावरील कोणत्याही लसीला शासनाची परवानगी मिळाली नाही, त्यामुळे लस मिळत असल्याची अफवा आहे. जानेवारी महिन्यात लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. लसीकरणाबाबत सगळीकडेच उत्सुकता, भय असतानाच लसीकरण होत असल्याची चर्चा समोर आली.

२५ डिसेंबरपर्यंत लसीकरणासाठी नावनोंदणीची मुदतकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी शहरातील आरोग्यसेवेत काम करणाऱ्या २२ हजार ५०० जणांची नोंदणी झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात  पोलीस, होमगार्ड, सफाई कामगार, विविध सरकारी कर्मचारी, संस्थांचे स्वयंसेवक, सेवाभावी संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे लसीकरण होईल. त्यासाठी शासनाने २५ डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत दिली आहे. अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाच्या अनुषंगाने संबंधितांना नावनोंदणी करण्याचे आवाहन मनपाने केले आहे. घाटी रुग्णालयातील सुमारे ४ हजार, एमजीएममधील दोन हजार ५००, मनपा व जिल्हा रुग्णालय २ हजार ५००, तसेच खासगी रुग्णालयातील १३ हजार ५०० डॉक्टर, कर्मचाऱ्यांची पहिल्या टप्प्यातील नोंदणी असल्याचे पाडळकर यांनी सांगितले. कोरोनाकाळात रुग्णांवर उपचार करणाऱ्या, संसर्ग कमी करण्यासाठी काम करणाऱ्या आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन पहिल्या टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू झाली आहे. लस जानेवारी महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

१०० केंद्रांवर व्यवस्था;पोलीस बंदोबस्तहीसुमारे १०० केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात येईल. मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण होईल. पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्यात येईल. नोंदणी केलेले नाव व केंद्रावर आलेले कर्मचारी तेच आहेत का? याची खात्री झाल्यांनतर आरोग्य कर्मचारी लस देतील. मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जास्तीचे केंद्र असतील, असे डॉ. पाडळकर यांनी  सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस